४ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत काश्मिरी नेते उमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि सज्जाद लोन यांना नजरकैद करण्यात आले. रात्रभर सोशल मिडियावर अंदाज वर्तवले जात होते, की सकाळी काहीतरी मोठं घडणार आहे. सकाळ झाली. ५ ऑगस्ट २०१९.
गृहमंत्री अमित शाह प्रधानमंत्री कार्यालयात पोहोचले. लोकांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी त्यांनी हात जोडले. याचवेळी अमित शहांच्या हातात एक कागद दिसून आला. कॅमेरामनने कागदावर लिहलेला मजकूर कॅमेरात कैद केला. कागदाच्या सर्वात वरच्या भागात लिहले होते टॉप सिक्रेट !
काय होते अमित शहांचे टॉप सिक्रेट ?
टेलीलेन्सचा वापर करुन या कागदावरील छापलेला मजकूर वाचला असता समजले की या टॉप सिक्रेट कागदावर प्रोसिजर लिहली होती. काश्मीरच्या मुद्द्यावर आतापर्यंत काय झाले आहे आणि अजून काय बाकी आहे ? त्यात पहिला कॉलम कॉन्स्टिट्युशनलचा आहे, दुसरा कॉलम पॉलिटिकलचा आहे आणि तिसरा कॉम लॉ अँड ऑर्डरचा आहे.
१) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि कॅबिनेटला प्रधानमंत्र्यांनी याची माहिती दिली आहे. २) निर्णयाविषयी जम्मू काश्मीरचे राज्यपाल आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली आहे. ३) ७ ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री मोदी देशाला संबोधित करु शकतात.
४) गृह सचिवांना जम्मू काश्मीरला पाठवण्यात येईल. ५) बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, मध्यप्रदेश, आसाम आणि आंध्रप्रदेशमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे सांगितले आहे.
एवढं सगळं लिहलेलं असलं तरी टॉप सिक्रेट विषयी कुठूनच कसलेच सूत जुळत नव्हते; जोपर्यंत अमित शहा राज्यसभेत याचा खुलासा करत नव्हते तोपर्यंत !
असे पकडले कॅमेराने टॉप सिक्रेट
टेली लेन्स नावाची कॅमेराला एक लेन्स असते. फोटोग्राफर्स दूरच्या गोष्टी कॅप्चर करण्यासाठी या टेली लेन्सचा वापर करत असतात. दूरच्या ज्या गोष्टी मानवी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या टेली लेन्सच्या मदतीने बघता येतात. यापूर्वीही एकदा टेली लेन्सचा सुंदर असा उपयोग करण्यात आला होता.
त्यावेळी या सुंदर लेन्सच्या मदतीने एका दहा लाखांच्या कोटावर कोरण्यात आलेली अक्षरे वाचण्यात आली होती. त्यावर देशात बरीच चर्चा झाली होती. आता तो कोट कोणाचा ते विचारु नका…
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.