जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवल्याने ३५-अ मधील तरतुदी आपोआपच रद्द झाल्या आहेत. त्यामुळे जम्मू काश्मीरला असणारा विशेष राज्याचा दर्जाही रद्द झाला आहे. हे कलमं हटवण्याची घोषणा करतानाच जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आली आहेत.
कालपर्यंत भारतात २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश होते; आता या निर्णयामुळे देशात २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश निर्माण होतील. पाहूया केंद्रशासित प्रदेश म्हणजे नेमकं काय असतं…
हे आहेत भारतातील सध्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश
भारतातील २८ राज्ये : आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, तामीळनाडू, त्रिपुरा, नागालॅंड, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, मणिपुर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मिझोरम, मेघालय, छत्तिसगढ, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, सिक्कीम, तेलंगण
भारतातील ९ केंद्रशासित प्रदेश : अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश, पुडुचेरी, लक्षद्वीप, जम्मू-काश्मीर, लद्दाख
केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय ?
सर्वसाधारणपणे वित्तियदृष्ट्या किंवा राजकीयदृष्ट्या कमकुवत आणि अस्थिर भूप्रदेशात शासन चालवण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याची आवश्यकता असते. केंद्रशासित प्रदेश म्हणजे असा प्रदेश जो भारतातील कोणत्याही राज्याचा भाग नसून त्याचे प्रशासन थेट केंद्र सरकारकडून चालवले जाते.
त्यांना घटकराज्यांचा दर्जा असतो. भारताचे राष्ट्रपती अशा प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाचा कारभार चालवण्यासाठी आपल्या अख्त्यारीखाली प्रशासकाची नेमणूक करतात. राज्यघटनेच्या ७ व्या घटनादुरुस्तीने त्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जाते.
भारतातील केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती कशी झाली ?
केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती वेगवगेळ्या कारणांसाठी केली जाते. दिल्ली, चंदिगढ आणि आताच्या जम्मू काश्मीर व लद्दाख या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती राजकीय आणि प्रशासकीय कारणांसाठी करण्यात आली आहे. पॉण्डेचारी, दीव आणि दमण, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती सांस्कृतिक वेगळेपणातून झाली आहे.
अंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्वीप बेटे या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती सामरिक व्यूहनीतीच्या दृष्टीने झाली आहे. दिल्ली आणि पॉंडेचरीप्रमाणे जम्मू काश्मीर हा विधानसभा असणारा केंद्रशासित प्रदेश असेल तर लद्दाख हा विधानसभा नसणारा केंद्रशासित प्रदेश असेल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.