आजच्या जमान्यात दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येकाला सुंदर दिसायचं आहे. या स्पर्धेत पुरुषांपेक्षा स्त्रिया पुढे आहेत. आपल्या शरीर आणि आकाराच्या बाबतीत त्या खूप पझेसिव्ह असतात. सडपातळ आणि सुंदर दिसण्याची त्यांची इच्छा लपून राहत नाही. अशा लोकांमध्ये अनेक समज गैरसमज असतात.
त्यापैकीच आपल्या स्तनांच्या आकार सुडौल असेल तरच आपण सुंदर किंवा आकर्षक दिसतो आणि पुरुष आपल्याकडे आकर्षित होतात अशी एक मनोधारणा साधारणपणे स्त्रियांमध्ये दिसून येते.
छोटे स्तन असणाऱ्या स्त्रियांमध्ये एकप्रकारचा न्यूनगंड असतो. याच न्यूनगंडातून अनेक स्त्रिया आपल्या स्तनांना सुडौल बनवण्यासाठी विविध औषधे आणि तेलांचा वापर करतात. परंतु पुरुषांवर प्रभाव टाकण्यासाठी स्त्रियांच्या स्तनांच्या आकारापेक्षा त्या स्त्रीचे व्यक्तिमत्वच अधिक प्रभावी ठरत असते हे त्यांना माहित नसते. आज आम्ही आपल्याला छोटे स्तन असल्याचे असे काही फायदे सांगणार आहोत, जे वाचल्यास स्त्रियांना आपले स्तन छोटे असल्याचा कधीच न्यूनगंड किंवा लाज वाटणार नाही.
१) ब्रा शिवाय वावरता येते – सुडौल दिसण्याच्या अट्टाहासापायी मुली तंग स्ट्रीप असणारे ब्रा घालतात, त्यामुळे त्यांना त्रास तसेच स्तनांचे आजारही होऊ शकतात. मात्र छोटे स्तन असणाऱ्या मुलींना ब्रा घालण्याची आवश्यकता नसते.
२) सडपातळ दिसता – ज्या मुलींचे स्तन छोटे असतात त्या मुलींचे शरीर इतर मुलींच्या तुलनेत सडपातळ दिसते. अनेक मुलींना हे रहस्य समजतच नाही.
३) लोक नजर रोखून बघत नाहीत – सुडौल स्तन असणाऱ्या मुलींच्या बाबतीत घडणारी हमखास गोष्ट म्हणजे या मुली चालताना किंवा बोलताना आजूबाजूला असणारे पुरुष किंवा मित्र त्यांच्या छातीकडे टक लावून पाहत असतात. यामुळे मुलींना अवघडल्यासारखे वाटते. याउलट छोटे स्तन असणाऱ्या मुलींशी बोलताना मुले त्यांच्या डोळ्यात पाहून बोलतात.
४) ब्रा निवडणे सोपे असते – छोटे स्तन असणाऱ्या मुलींना ब्रा साठी रंग, डिझाईन, प्रकारांमध्ये अनेक पर्याय असतात. त्यांना कप साईजचे ब्रा नसले तरी चालतात. याउलट सुडौल स्तन असणाऱ्या मुलींना ब्रा निवडताना C कप की D कप साईज निवडावी यात गोंधळ होतो.
५) खेळताना आराम वाटतो – छोटे स्टॅन असणाऱ्या मुली खेळताना आरामात उड्या मारु शकतात. याउलट सुडौल स्तन असणाऱ्या मुलींना सर्वांसमोर खेळताना उड्या मारण्यात संकोच वाटतो.
६) उत्तेजित करतात – व्हिएन्ना युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार छोटे स्तन असणाऱ्या मुली इतर मुलींच्या तुलनेत पुरुषांना २४ पट अधिक उत्तेजित करतात.
७) कंबरदुखी होत नाही – एका संशोधनानुसार सुडौल स्तन असणाऱ्या मुलींना छोटे स्तन असणाऱ्या मुलींच्या तुलनेत कंबरदुखीचा अधिक त्रास असतो. छातीचे वजन जास्त असल्याने रात्री कंबरदुखीचा त्रास होतो.
८) खोल गाळ्यांचे कपडे घालता येतात – क्लीवेज दिसत नसल्याकारणाने छोटे स्तन असणाऱ्या मुली आरामात खोल गाळ्यांचे कपडे घालू शकतात. तसेच बॅकलेस कपडे घालताना ब्रेस्ट लिफ्टिंग पट्टी घालण्याची गरज पद्त्वनाही.
९) पोटावर झोपू शकतात – सुडौल स्तन असणाऱ्या मुलींना पोटावर झोपताना अडचण होते. याउलट छोटे स्तन असणाऱ्या मुलींना बिछान्यावर कसेही उलट सुलट आरामदायक झोपता येते.
१०) वाढत्या वयानुसार स्तन सैल पडत नाहीत – गर्भावस्थेनंतर स्तनपान केल्यानंतर हळूहळू स्तनांच्या पेशी विस्तारतात. छोटे स्तन असणाऱ्या मुलींच्या बाबतीत हा परिणाम जास्त दिसून येत नाही, तसेच स्तन खाली झुकत नाहीत.
तर मुलींनो, आता ही माहिती वाचल्यानांतर तुमच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन तुमच्यातील आत्मविश्वास वाढायला नक्की मदत होईल. इतर मुलींच्या तुलनेत स्वतःला कमी समजायची आता काही गरज राहणार नाही