सनी लिओनी हे सतत चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व बनले आहे. कधी कुठल्या फोटोमुळे, कधी कुठल्या डान्समुळे तर कधी कुठल्या सामाजिक उपक्रमामुळे ! आता अजून एकदा सनी परत चर्चेत आली आहे. नुकतेच सनीने एका तरुणाची माफी मागितल्याचा प्रसंग घडला आहे. तिने त्या तरुणाची माफी का मागितली ते पुढे तुम्हाला सांगण्यात येईलच, पण आधी हे जाणून घेऊया की तो मुलगा आहे तरी कोण ?
तो मुलगा आहे तरी कोण ?
सनीने माफी मागितलेल्या त्या युवकाचे नाव आहे पुनीत अग्रवाल ! २७ वर्षांचा पुनीत आपल्या कुटुंबियांसोबत दिल्लीतल्या प्रीतमपुरा भागात राहतो. गेल्या काही दिवसांपासून पुनीतला वेगवेगळ्या नंबरवरून दररोज १००-१५० व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल येत आहेत. नुसते कॉलच नाही तर मोठ्या संख्येने मेसेजही येत आहेत. कॉल आणि मेसेज करणारे लोक त्याला सनी लिओनी सोबत बोलायचे आहे म्हणून सांगत आहेत.
काही लोक तर अश्लील कॉल आणि मेसेजसुद्धा पाठवत आहेत. या प्रकाराने गोंधळलेल्या पुनीतने सुरुवातीला हा सनीचा नंबर नाही म्हणून सांगितले, पण लोकांचे कॉल आणि मेसेज काय बंद झाले नाहीत. शेवटी पुनीतला या कॉलमागचे कारण समजले आणि त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. आता तुही म्हणाल यात सनीचा काय संबंध ? इथेच तर गमंत आहे.
या कारणामुळे मागितली सनीने त्या तरुणाची माफी
त्याचं झालं असं की २६ जुलैला सनी लिओनीचा “अर्जुन पटियाला” चित्रपट रिलीज झाला. त्या चित्रपटात एका पोलिसाला सनी आपला मोबाईल नंबर सांगत असते. पण योगायोग असा की चित्रपट बघणाऱ्या अतिउत्साही लोकांनी तोच नंबर सनीचा म्हणून सेव्ह करून घेतला आणि तो नेमका पुनीत अग्रवालचा निघाला. थिएटरमधून चित्रपट बाहेर आलेले लोक शांत बसतील तर ना, त्यांनी सनीचा नंबर समजून पुनीतलाच कॉल आणि मेसेज पाठवायला सुरुवात केली. या प्रकाराबद्दल सनीने खट्याळपणे पुनीतची माफीही मागितली आहे.
माफी मागताना सनीनेही केला थोडा खट्याळपणा
Zoom TV ला मुलाखत देताना सनीला या प्रकाराबद्दल विचारले असता तिने त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुनीतची माफी मागितली. पण माफी मागतानाही तिने पुनीतची थोडी मस्करी केली. “तुला मानसिक त्रास व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. झालेल्या प्रकाराबद्दल मी माफी मागते. परंतु तुला फार मजेशीर लोकांनी कॉल केले असतील.”
वास्तविक पाहता चित्रपट, सीरियलमध्ये असे डायलॉगमध्ये संपूर्ण मोबाईल नंबर घेण्याऐवजी अर्धवट उच्चार किंवा अस्पष्ट नंबर दाखवले जातात. पुनीतच्या प्रकरणात सनीने माफी मागितली असली तरी पुनीत काय निर्णय घेतोय किंवा चित्रपटातून तो मोबाईल नम्बरवाला सिन वगळतात का हे पाहण्यासारखे आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.