जम्मू काश्मीर मध्ये अमरनाथ यात्रेसाठी हजारो यात्रेकरू रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये मागच्या अनेक आठवड्यांपासून भारतीय सैन्याच्या हालचाली दिसून येत होत्या. यामागे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. पण २ ऑगस्टच्या घडलेल्या घटनांमुळे काश्मीरचे वातावरण परत एकदा गरम झाले आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना अमरनाथ यात्रेकरूंवरील एका मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावण्यात यश आले आहे. पाहूया काय आहे प्रकरण…
नेमकं काय झालं ?
अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दलाचे जवान आपले सर्च ऑपरेशन राबवत असताना यात्रेच्या मार्गावर दहशतवाद्यांच्या एका गुप्त ठिकाणावरून जवानांनी M-24 ही अमेरिकन स्नायपर रायफल जप्त केली आहे. त्यासोबतच पाकिस्ताननिर्मित एक भूसुरुंग आणि अन्य स्फोटक साहित्यही जप्त केले आहे.
या सुरुंगाचा उपयोग पाकिस्तानच्या सेनेकडून करण्यात येतो. त्यांनतर त्वरित जम्मू काश्मीर सरकारच्या गृह विभागाकडून सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा थांबण्यात येत असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात्रेकरूंना लवकरात लवकर यात्रा संपवून डोंगरदऱ्यांच्या प्रदेशातून निघून जाण्याच्या सल्ला देण्यात आला आहे.
या स्नायपर रायफलचा विषय नक्की काय आहे ?
स्नायपर रायफल या शस्त्राला कुठल्याही देशाच्या सैन्य किंवा पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत महत्व असते. एक स्नायपर रायफल शक्तिशाली शत्रूवरही भारी पडू शकते. एखाद्या निष्णात नेमबाजावरच स्नायपर रायफलची जबाबदारी दिलेली असते. पाकिस्तानी सैन्याने अमेरिकेकडून स्नायपर रायफल शस्त्र खरेदी केल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून त्यांचा वापर करण्यात येतो. ही स्नायपर सापडल्यानेच जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट लावण्यात पुकारण्यात आला आहे.
भारताबद्दल बोलायचे झाले तर पूर्वी परदेशातून खरेदी केलेली रायफलच भारतीय स्नायपरला दिली जात असायची. भारतातील स्नायपर पूर्वी जर्मनीत बनवण्यात आलेली हेक्लर अँड कोच म्हणजेच H & N रायफल वापरायचे. परंतु आता भारतीय स्नायपर स्वदेशी स्नायपर रायफलचा वापर करतात.
पश्चिम बंगालच्या इशापूर शस्त्र निर्मिती कारखान्यात भारतीय स्वदेशी बनावटीच्या स्नायपर रायफल बनवल्या जातात. या रायफलची किंमत प्रत्येकी ८०००० रुपये असल्याचे सांगितले जाते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.