मुंबईच्या BYL नायर हॉस्पिटलमधील जुनिअर डॉक्टर आणि गायनॉकॉलॉजीमध्ये MD करणाऱ्या डॉ.पायल तडवी यांनी तीन सिनियर डॉक्टरांच्या छळाला आणि जातीवाचक शेरेबाजीला कंटाळून २२ मे २०१९ रोजी आपल्या होस्टेलच्या खोलीत आत्महत्या केली होती.
या गोष्टीला दोन महिने उलटून गेल्यानंतर डॉ.पाटील तडवींनी आपल्या आईवडिलांना लिहलेले एक पत्र समोर आले आहे. हे पत्र कमी पण आत्महत्येची चिठ्ठीच जास्त वाटते. पायलने त्यात आपल्या आत्महत्येची कारणे दिली आहेत. ते पत्र पुढीलप्रमाणे :
“आई-बाबा, माझे आयुष्य संपवत असल्याबद्दल मी तुमची माफी मागते. मला माहित आहे की मी तुमच्यासाठी किती महत्वाची आहे. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आहे. पण आता या गोष्टी असह्य झाल्या आहेत. मी त्यांच्यासोबत एक मिनिटसुद्धा राहू शकत नाही.
एक दिवस हे सगळं संपून जाईल या एका आशेवर मागच्या एक वर्षांपासून आम्ही त्यांना सहन करत आहे. पण आता मला केवळ शेवट दिसत आहे. खरं तर या सगळ्यातून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग नाही, मला यातून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग दिसत नाही. मी अडकली आहे. एकेक दिवस उलटत चालला आहे पण इथून बाहेर पडण्याचा कुठलाच रस्ता दिसत नाही आहे. असं का आहे ? आपल्या लोकांमध्ये असं काय आहे ज्यामुळे असा त्रास सहन करावा लागत आहे.
शक्य तेवढे सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर मी आज या निर्णयापर्यंत आली आहे. इथे आपल्या बाजूने उभे राहणारे कोणीच नाही हे मला कळलं आहे. डिपार्टमेंटमध्ये आपले समर्थन करणारे कुणीच नाही. खरं तर ही सगळी आपलीच चूक आहे किंवा आपणच चुकीचा विचार केला आहे. मला नेहमी स्त्रीरोगतज्ञ व्हावं असं वाटायचं. पहिल्यापासून हे माझे स्वप्न होते.
एका चांगल्या संस्थेत शिकायला मिळेल असा विचार करून मी इथे पाऊल ठेवले होते. पण लोकांनी आपले रंग दाखवायला सुरु केले. सुरुवातीला मी आणि स्नेहल काहीच बोललो नाही. पण नंतर हा त्रास इतका वाढला की मी सहन करू शकली नाही. मी त्यांच्या विरोधात तक्रार केली, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. परिस्थिती तशीच राहिली आणि दिवसामागून दिवड जात राहिले. रुग्ण, कर्मचारी यांच्यासमोर आमच्यासोबत असेच वर्तन केले जात होते.
मी माझे सगळं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य हरवून बसली आहे. कारण त्यांनी निश्चयच केला आहे की जोपर्यंत ती लोकं या हॉस्पिटलमध्ये आहेत, तोपर्यंत मला काहीही शिकू देणार नाहीत. मला एनसी आणि स्त्रीरोगांबद्दल काहीही शिकायला मिळू नये म्हणून मला पीएमसी वार्डात टाकले गेले.
मागचं आठवडे मला लेबर रुम सांभाळायला मनाई केली आहे, कारण ते मला त्यात कुशल मानत नाहीत. ओपीडीच्या तासांदरम्यान मला लेबर रूमच्या बाहेर थांबायला सांगितले आहे. मला रुग्णांची तपासणी करण्याची परवानगी देत नाहीत. फक्त क्लार्कचे काम करवून घेत आहेत.
पूर्ण प्रयत्न करूनही परिस्थितीत सुधारणा होत नाही. मी मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली आहे. इथे काम करण्यासाठी चांगले वातावरण नाही. वातावरण बदलेल याची आशाच मी सोडून दिली आहे. कारण मला माहित आहे की हे बदलणार नाही. स्वतःसाठी आवाज उठवून काहीही उपयोग नाही. माझ्या आणि स्नेहलच्या या अवस्थेसाठी मी हेमा अहुजा, भक्ती मेहरा आणि अंकिता खंडेलवाल यांना जबाबदार मानते. मी खूप प्रयत्न केला. अनेकदा पुढे येऊन मॅडम सोबत बोलले, पण काहीही केले गेले नाही. मला खरोखरच कुठलाही मार्ग दिसला नाही. मी केवळ शेवट बघू शहते.
हे पाऊल उचलण्याबद्दल आपली माफी मागते. माझ्या मैत्रीणीबद्दल खूप विचार केला, मला माहित नाही की स्नेहल त्या तिघींचा कसा सामना करेल. मी तिला त्यांच्यासमोर सोडताना घाबरून गेली आहे.”
या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तिन्ही आरोपींचा जामीन ३० जुलै पर्यंत फेटाळला होता. ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा झाल्यानंतर पहिल्यांदा मुंबई उच्च न्यायालय डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणात केलेल्या जामीन अर्जाच्या सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग करणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.