परदेशात लिव्ह इन रिलेशनशिपचं चांगलंच फॅड आहे. हे फॅड तेवढं बघायला गेलं तर अजून तर भारतात आलेलं नाहीये. इतर देशांच्या तुलनेत लिव्ह ऊन मध्ये राहणाऱ्यांची संख्या भारतात खूप कमी आहे. तरी मागील काही वर्षांमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या लग्नाबद्दल वेगळा विचार करतात. एकतर लग्नातील वेगवेगळ्या अडचणींमुळे तरुणांचा लग्नाबाबत नकारात्मक दृष्टीकोनही बघायला मिळतो.
आजकालचे काही किंवा एका क्लासमधील तरूण असा विचार करतात की, लग्न करणे हा त्यांचा खाजगी निर्णय आहे. घरच्यांनी लग्न करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करू नये असे मत बनलं आहे. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी लिव्ह इन मध्ये राहणे पसंत करायला लागले आहेत. तरुणांचा कल लिव्ह इन रिलेशनशिपकडे इतका का आहे, याची काही निरीक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.
1)एकमेकांच्या स्वभावांची माहिती होते- सोबत राहिल्याने दोघांनाही एकमेकांच्या स्वभावांची, सवयींची माहिती होऊन बरंच काही साध्य होतं. लग्न करण्याआधी एकमेकांना चांगल्याप्रकारे जाणून घेण्यासाठी हे उपयुक्त ठरतं. यावरून ठरवता येते कि ते एकमेकांसोबत आयुष्यभर राहू शकतील कि नाही.
2)प्रेम वाढतं- एकमेकांसोबत राहिल्याने प्रेम वाढतं असं मानलं जातं. लग्नागोदर सोबत राहिल्याने प्रेम वाढून नातं घट्ट होण्यास मदत होते. प्रेम वाढलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही वाढलं तर तेही कळेलच.
3) आर्थिक स्थैर्य- लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहताना तरुण-तरुणी सहसा दोघेही नोकरी करत असतात. त्यामुळे ते एकमेकांवर अवलंबून राहत नसतात. घरातील खर्च वाटला गेला असतो. त्यामुळेही या नात्यात अनेकांना इंटरेस्ट असतो. कारण कोणतही आर्थिक दडपण त्यांच्यावर नसतं.
4) स्वातंत्र्य- आजकालचे तरुण-तरुणी स्वतंत्र विचारांचे असतात. मुलगा असो वा मुलगी दोघांनाही त्यांचं स्वातंत्र हवं असतं. काही लोकांना लग्न करुन स्वत:ला एका साच्यात बांधून घ्यायचं नसतं. त्यामुळेही काही लोक लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतात.
5) जबाबदाऱ्यापासून दूर पळणे- आजच्या पिढीतील सर्वांनाच नाही पण काहींना जबाबदाऱ्यांची भीती वाटते. लग्न केल्यास पती-पत्नीवर एकमेकांची जबाबदारी असते. पण लिव्ह-इनमध्ये असं काही नसतं. त्यामुळेही काही तरुण हे नातं स्विकारतात.
6) घटस्फोटाची गरज नाही- लिव्ह-इनमध्ये पार्टनरसोबत कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही विचार करुन त्याला सोडू शकता. त्यांना जर वाटत असेल की, त्यांचं नातं पुढे जाऊ शकत नाही तेव्हा ते सहज वेगळे होऊ शकतात.
7) परिवाराचं टेन्शन नाही- अनेकदा काही मुलींना किंवा काही मुलांना पार्टनरच्या फॅमिलीसोबत जुळवून घेण्यास अडचण असते. लग्न झाल्यावर दोन परिवारांची जबाबदारी आपसूक येते. अशात काहींना ही जबाबदारी नको असते. त्यामुळेही काही लोक हे लिव्ह-इनचा मार्ग धरतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.