ऑनलाईन गेमिंग म्हणजे आपल्या नेक्स्ट जनरेशनचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. शहरात इंटरनेट सुविधा चांगल्या प्रकारे मिळत असल्याने तिथल्या मुलांमध्ये ऑनलाईन गेमिंगची जास्त आवड दिसून येते. शहरातील अनेक ठिकाणी गेमिंग झोन हा व्यवसाय म्हणून पुढे आला आहे.
तासनतास गेम खेळणाऱ्या मुलांमुळे गेमिंग झोन हाऊसफुल दिसून येतात. स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरमुळे ग्रामीण भागातही ऑनलाईन गेमचे फॅड वाढले आहे. पण आपल्या याच आवडीतून एका १५ वर्षांच्या मुलाने ७.५ कोटी रुपये कमावल्याचे उदाहरण समोर आले आहे. पाहूया काय आहे हे प्रकरण…
कोण आहे हा छोटा करोडपती ?
वयाच्या १५ व्य वर्षी ७.५ कोटी रुपये कमावणाऱ्या या चिमुकल्याचे नाव आहे जेडन ऐशमन, तो लंडनचा आहे. जेडनने सांगितले की मी माझ्या रूममध्ये बसून ८-८ तास व्हिडीओ गेम खेळायचो. त्यामुळे आईही त्याच्यावर सारखी रागवत असायची. गेममुळे आपण आपला वेळ वाया घालवत आहोत असेही त्याला सारखे वाटायचे. आपल्या मुलाच्या या गेमिंगच्या व्यसनापायी आईने तर एकदा त्याला व्हिडीओ गेमच्या कंट्रोलरने मारले होते.
असे जिंकले जेडनने ७.५ कोटी
फोर्टलाईट नावाचा एक ऑनलाईन बॅटल गेम आहे. न्यूयॉर्कच्या टेनिस स्टेडियममध्ये फोर्टलाईट वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १२ ते ४० वयातील जवळपास जगातील ४ कोटी गेमर्सने सहभाग घेतला. तीन दिवस चाललेल्या या गेममध्ये ३० देशांचे १०० गेमर निवडण्यात आले.
जेडनने आपल्या डेवे जोंग नावाच्या मित्रांसोबत त्यात भाग घेतला. त्या स्पर्धेत त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे जवळपास १५.५० कोटींचे बक्षीस मिळाले. ती रक्कम दोघांनी वाटून घेतली. अशा प्रकारे १५ वर्षांच्या जेडनने ऑनलाईन गेम खेळून ७.७ कोटी रुपये कमावले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.