थांबा थांबा ! गोंधळून जाऊ नका. हे ते “अमित शाह” नाहीत ! हे वेगळे अमित शाह आहेत. या अमित शाह आणि आदित्य मदिराजू यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात असणाऱ्या श्री स्वामीनारायण मंदिरात अमित आणि आदित्य यांचा विवाह सोहळा पार पडला. या दोघांनी हे पाऊल उचलल्याने त्या लोकांना नवी प्रेरणा मिळाली आहे, जे लोक प्रेमाला स्वतंत्र मानतात. अमित आणि आदित्यला सोशल मीडियातून लोकांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अशी झाली होती अमित शाह आणि आदित्य मदिराजू यांची भेट
अमित आणि आदित्य एकमेकांना सर्वप्रथम तीन वर्षांपूर्वी मित्राच्या बर्थडे पार्टीमध्ये एका छोट्या बारमध्ये भेटले होते. तिथेच त्या दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केले होते. तेव्हापासून त्यांच्या भेटीगाठी व्हायला सुरुवात झाली.
तीन वर्ष अमित आणि आदित्यने एकमेकांना डेट केले. त्यांचे एकमेकांवर प्रेम वाढत गेले. शेवटी त्यांनी लग्न करणायचा निर्णय घेतला. २२ जुलै रोजी त्यांनी न्यू जर्सीत श्री स्वामीनारायण मंदिरात एकमेकांसोबत लग्न केले आहे.
समलैंगिक मित्रांनी दिल्या शुभेच्छा
अमित आणि आदित्य यांचा विवाह त्या सर्व मित्रांसाठी एक प्रेरणा होती, ज्यांना समाजात समलैंगिक म्हणून हिनवले जाते. प्रेमाला जात, धर्म, वय, आर्थिक परिस्थिती अशा कशाचेच बंधन नसते, त्यात आता प्रेमाला जेंडरचे सुद्धा बंधन नसते म्हणून समाजात मान्यता मिळायला हवी.
एक दिवस असा येईल जेव्हा लोकांना पटेल की, अमित आणि आदित्य यांनी समलैंगिक विवाह नाही, तर लग्न केले आहे. नेहमीप्रमाणे लोकांनी या लग्नावरही टीका केली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.