बॉलिवूडचीच नव्हे तर आता हॉलीवूडमध्येही जाऊन काम करणारी देसी गर्ल प्रियांका चोपचा नुकताच वाढदिवस पार पडला. प्रियांका ३७ वर्षांची झाली. सोशल मीडियावरही प्रियांकाच्या चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तर मिम सेनेने प्रियांकाच्या फोटोंचे वेगवेगळे मिम्स बनवून सगळीकडे शेअर केले. एवढं सगळं ठीक असलं तरी प्रियांकाचा वाढदिवस गाजला तो एका विशेष कारणाने ! प्रियंकाने आपल्या ३७ व्या वाढदिवसाला कापलेल्या केकचा विषय चांगलाच चर्चेत होता.
एवढा महाग होता हा केक
आता सोशल मीडियावर ज्या केकची एवढी चर्चा झाली, अगदी केकचे सुद्धा memes व्हायरल झाले: अशा केकची किंमत आपल्याला माहिती करून घ्यायला नक्की आवडेल. काही झालं तरी प्रियांका आणि निक जोन्सचे लग्न झाल्यानंतर नंतर देसी गर्ल आपला पहिलाच वाढदिवस साजरा करत होती.
केकची किंमत काळजावर हात ठेवून वाचा. प्रियंकाने आपल्या ३७ व्या वाढदिवसाला कापलेल्या केकची किंमत आहे ३४५००० रुपये. तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये !
वाचून धक्का बसला ना ?
धक्का तर बसणारच होता ! एवढ्या पैशात आपल्याकडे एखाद्याचे लग्न पार पडले असते. आपण १०० वर्ष जगू असे गृहीत धरले तरी आपल्या आयुष्यभर कापलेल्या केकची रक्कम एवढी व्हायची नाही. केकचे सोडा, प्रियांका आपल्या पती निक जोन्स, बहीण परिणीती चोप्रा आणि आई मधु चोप्रा यांच्यासोबत खुश होती हे महत्वाचं आहे. उंचे लोग उंची पसंद सारखं आयुष्य असत या लोकांचं ! आपण आपल्या बेकरीतल्या केकवर समाधानी राहूया.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.