कोल्हापूरकरांचा प्रत्येक विषय हार्ड असतो. कोल्हापूरकरांची रांगडी भाषा, कोल्हापूरची चप्पल, कोल्हापूरचे पैलवान, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापूरकर यांची जगभर चर्चा असते. इथली प्रत्येक गोष्ट जगात प्रसिद्ध आहे. जगात भारी कोल्हापुरी असं उगीच म्हणत नाहीत.
कोल्हापूरकरांना कधी पाट्या लावायची गरज पडत नाही, कारण त्यांचं जे काय असेल ते तोंडावर असतं. पण आता कोल्हापूर एका पाटीवरूनच पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कोल्हापूरच्या एका पठ्ठ्याने अमेरिकेत घेतलेल्या गाडीला चक्क कोल्हापूरकरांचा अभिमान असलेली नंबर प्लेट लावली आहे.
कोण आहे हा कोल्हापूरचा पठ्ठ्या ?
कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील सावर्डे गावातले विष्णू पाटील आणि वैशाली पाटील यांचा मुलगा विशाल पाटील या तरुणाने अमेरिकेतही कोल्हापुरी बाणा जपला आहे. मूळचे सावर्डे गावातील असणारे पाटील दाम्पत्य इचलकरंजी जवळच्या बोरगावमध्ये व्यवसायासाठी स्थायिक आहेत. त्यांचा मुलगा विशाल याने इथेच राहून सॉफ्टवेअर इंजिनिअरचे शिक्षण घेतले.
त्यांनतर विशालने पुण्यात मोठमोठ्या कंपनीत जॉब केला आणि पुढे अमेरिकेत जाऊन नोकरी शोधली. सध्या विशाल आपल्या पत्नी मुलांसह अमेरिकेतच स्पेशल सॉफ्टवेअर इंजिनिअर या मोठ्या पदावर नोकरीस आहेत.
असा जपला अमेरिकेत कोल्हापुरी बाणा
विशाल यांनी आपल्या सॉफ्टवेअर कंपनीकडून जगप्रसिद्ध अशा फोर्ड कंपनीला सॉफ्टवेअर बनवून दिले आहे. अमेरिकेत त्याने एक आलिशान कार घेतली. अमेरिकेत कोणतेही जास्तीचे शुल्क न भरताही कारची ७ अंकी किंवा अक्षरांचा नंबर घेता येतो, हे विशालला माहित होते.
मग हा कोल्हापूरकर मागे कसा हटेल. माहित मिळताच विशालने MH09VVP हा नंबर घेतला. MH 09 ही कोल्हापूरची ओळख आहे. VVP म्हणजे विशाल विष्णू पाटील. एकप्रकारे अमेरिकेत जाऊन आपला कोल्हापुरी पाटील बाणा विशालने जपला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.