जे स्टार किड्स आणि बाल कलाकार खूप प्रकाशझोतात राहतात, त्यांच्याबद्दल तुम्ही भरपूर काही ऐकले असेल. आज आपण अशाच एका बाल कलाकाराबद्दल बोलत आहोत. त्या बाल कलाकारास तुम्ही तिच्या ऍक्टिंग बद्दल भलेही लक्षात ठेवले नसेल, पण जेव्हा कधी तुम्ही सिनेमाघरात चित्रपट बघायला जाता तेव्हा पडद्यावर दिसणाऱ्या “नो स्मोकिंग”च्या जाहिरातीत आपल्या वडिलांसोबत बसलेल्या त्या गोड मुलीचा सुंदर असा चेहरा तुमच्या चांगल्याच लक्षात असेल.
नो स्मोकिंगच्या जाहिरातीतील ती गोड मुलगी कोण ?
१० वर्षांपूर्वीच्या त्या नो स्मोकिंगच्या जाहिरातीतील मुलीचा क्युटनेस आणि स्माईल तुम्हाला नक्की आवडली असेल. त्या गोड मुलीचे नाव आहे सिमरन नाटेकर. ती मुंबईची राहणारी आहे.
दहा वर्षांपूर्वी आलेली नो स्मोकिंगची जाहिरात अजून बदलली नसली, तरी त्या जाहिरातीतील सिमरन आता मोठी झाली आहे. सिमरन आज १९ वर्षांची तरुणी आहे. मात्र तिच्या चेहऱ्यावरील तो पूर्वीचा क्युटनेस आणि ते सौंदर्य आजही तितकेच मोहक आहे.
सिमरन आज काय करते ?
नो स्मोकिंगच्या जाहिरातीतील तो गोड चेहरा आता अनेक टीव्ही सिरियल्समध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. नो स्मोकिंगच्या जाहिरातीमुळे सिमरनला टीव्ही इंडस्ट्रीत ब्रेक मिळाला. तिने डॉमिनो, व्हिडिओकॉन, क्लिनिक प्लस, बारबा इत्यादि अनेक जाहिरातीत काम केले.
सोनी टीव्हीवरच्या “पहारेदार पिया की” या शो मध्ये सिमरन कुंवर रतनसाच्या बहिणीच्या रोलमध्ये दिसली. “दावत-ए-इश्क” चित्रपटातही ती बघायला मिळाली. सिमरन सोशल मीडियावर सुद्धा नेहमी ऍक्टिव्ह असते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.