भारतात वेगवेगळ्या रूढीपरंपरा काही नवीन नाहीत. अनेक अशा रूढीपरंपरा आहेत ज्या ऐकून आपल्याला हसू येते. तर काही परंपरा या धक्कादायक असतात. भारतात लग्नाबाबत तर प्रत्येक गावानुसार, शहरानुसार, राज्यानुसार वेगवेगळ्या रूढी परंपरा बघायला मिळतात. लग्नासंबंधी भारतात शेकडो रूढीपरंपरा आहेत.
पण आज आपण एक अशी परंपरा बघणार आहोत जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हि परंपरा आहे लग्न करण्यासाठी दुसऱ्याची पत्नी चोरून आणण्याची. डेली मेलने यासंबधी एक वृत्त दिले असून पश्चिम आफ्रिकेत एक असा समाज आहे जिथे लग्न करण्यासाठी दुसऱ्याची पत्नी चोरुन आणावी लागते. या रिवाजामुळे येथील लोक एकमेकांच्या पत्नी चोरुन लग्न करतात. या अनोख्या रिवाजाबाबत जाणून घेऊ आणखी काही.
पश्चिम आफ्रिकेत असलेल्या वोदाब्बे जमातीत हि अजबगजब प्रथा आहे. इथे लोक एकमेकांच्या पत्नींना चोरुन आणून लग्न करतात. गेल्या कित्येक वर्षांपासून या लोकांमध्ये ही परंपरा सुरु असून अशाप्रकारचं लग्न करण्यासाठी या जमातीच्या लोकांची वेगळी ओळख आहे.
या समाजात पहिलं लग्न हे कुटुंबाच्या मर्जीने केले जाते. पण दुसरं लग्न करायचा रिवाज फारच वेगळा आहे. या समाजात दुसऱ्या लग्नासाठी दुसऱ्या व्यक्तीची पत्नी चोरुन आणणे गरजेचे आहे. जर तुम्ही दुसऱ्याची पत्नी पळवून आणू शकत नसाल तर तुम्हाला इथे दुसरे लग्न करण्याचा अधिकार नाहीये.
विशेष म्हणजे या समाजात दरवर्षी गेरेवोल फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. या फेस्टिव्हलमध्ये मुलं साज करुन चेहऱ्यावर रंग लावून डान्स करतात. अजूनही वेगवेगळ्या गोष्टी करून ते दुसऱ्यांच्या पत्नींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.
दुसऱ्याच्या पत्नीला पटवण्यासाठी तिच्या पतीला याची खबर लागणार नाही याची देखील काळजी येथे घ्यावी लागते. एखादी महिला जर दुसरं लग्न करण्यास तयार झाली तर समाज हा त्यांचं दुसरं लग्न लावून देतो. या दुसऱ्या लग्नाला इथे लव्ह मॅरेज म्हणूण स्विकारलं जातं.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.