गोष्ट रिलेशनशिप विषयी असेल तर त्यात संवाद महत्वाचा असतो. एखादा चांगला शब्दप्रयोग प्रेमिकेच्या हृदयाची दारे उघडू शकतो तर एखादा चुकीचा शब्दप्रयोग तिचा मूड ऑफही करू शकतो.
जगातील कोणत्याच दोन स्त्रिया अगदी एकमेकींसारख्या नसतात, पण अशी काही वाक्ये आहेत जी सर्वच मुलींना मुलांकडून ऐकायला आवडतात. रिलेशनशिप एक्सपर्टच्या मदतीने निवडलेली ३० वाक्ये आम्ही आपल्यासाठी इथे देत आहोत. आपल्या गर्लफ्रेंडसोबतच्या संवादात त्यांचा अवश्य वापर करा.
काही विशेष वाक्य आपल्यासाठी
१) तुला माहिती आहे का मला तुझ्याबद्दल काय आवडते ? २) तुझं बरोबर आहे ! ३) तू खूप अप्रतिम दिसत आहे ! ४) आपण एकत्र आहोत ! ५) कालची रात्र अविस्मरणीय होती ! ६) तुला काही हवं असेल असेल तर मी आहे !
७) तुला आलेला आतापर्यंतचा सर्वात चांगला अनुभव कोणता ? ८) तू पहिल्यासारखीच सुंदर दिसतेस ! ९) मला जास्त समजत नाही, पण मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन ! १०) मी तुला कशा पद्धतीने मदत करू शकतो ?
११) मला तुझ्याबद्दल असं वाटत आहे… १२) तू खूप मोहक आहेस ! १३) याबद्दल मी तुझं मत जाणून घेऊ शकतो का ? १४) मी तुझ्यावर प्रेम करतो ! १५) आपल्यासाठी मी यादिवशीचा प्लॅन करत आहे ! १६) मेकअपशिवाय तू कशी दिसतेस हे पहायला मला आवडेल !
१७) मला आवडणाऱ्या तुझ्या चांगल्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे… १८) तुझ्यासोबत वेळ घालवायला मला आवडते ! १९) मी तुला यात मदत करू इच्छित आहे… २०) एक खरं सांगू…
२१) तुझा आजचा दिवस कसा गेला ? २२) तुझासोबत असं झाल्याने मला वाईट वाटलं… २३) मला असं वाटतंय मी तुला सगळं काही सांगू शकतो ! २४) काही हरकत नाही ! २५) मला तुझा आदर आहे कारण… २६) अरे व्वा ! तो तरुण तुझ्याकडे पाहत होता ! २७) तुला माझ्याकडून काय हवे आहे ? २८) तुझं काम खूप महत्वाचं आहे ! २९) त्या गोष्टीची काळजी घेतल्याबद्दल थँक्स ! ३०) माझ्यासाठी तूच एकमेव सर्वकाही आहेस !
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.