सध्या देशात आधुनिक वातावरण तयार झाले असल्याने तरुण मुले मुली एका टप्प्यावर पोहचले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप सारखे प्रकार जे पूर्वी मेट्रो सिटी मध्ये पाहायला मिळायचे आता साधारण जिल्हा ठिकाणी पण पाहायला मिळतात. त्यामुळे सध्या अनेक मुलंमुली बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड या नात्यात असतात.
जेव्हा त्यांना वाटते कि आपण पुढे जावे तेव्हा प्रश्न येतो की अविवाहित असणाऱ्या जोडप्याला कोण रूम देणार कि नाही ?? आज आपण माहिती घेणार आहोत कि भारतात कायदेशीररित्या अविवाहित जोडप्याना हॉटेल रूम मध्ये खाजगी क्षणांचा उपभोग घेता येतो कि नाही.
आता पर्यंत आपल्या देशात २९४ या कायद्याचा वापर करून पोलीस अविवाहित जोडप्याना कधीही पकडून पोलीस स्टेशन ला घेऊन जायची किंवा त्यांच्यावर निर्बंध आणायची. सर्वात पहिले २९४ काय आहे ते पाहू २९४ IPC प्रमाणे कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी अश्लील गोष्टी करता येत नाहीत.
कोणी जोडपे सार्वजनिक ठिकाणी किस वैगेरे घेताना आढळले कि त्याच्यावर या २९४ प्रमाणे गुन्हे नोंदवले जायचे. तर आता आपण हॉटेल रूम मध्ये काही गोष्टी करणार असतील तर या कायद्याचा भंग होतो का हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल ..
आपण दोघे हि बालिक असाल तर आपल्याला हॉटेल मध्ये रूम घेऊन खाजगी क्षण घालवता येऊ शकतात..त्यासाठी आपण हॉटेल मध्ये रूम बुक करण्याअगोदर त्या हॉटेल मध्ये अविवाहित जोडप्याना रूम देण्याची तरतूद असायला हवी. जर त्या हॉटेल मध्ये अविवाहित जोडप्याला रूम देण्याचा रुल असेल तर आपण त्याठिकाणी दोंघाचे ओळखपत्र देऊन तिथे राहू शकतो.
आपल्याला कोणतीही धाड पडायची वैगेरे भीती बाळगायची आवश्यकता नाही. आपण ज्या हॉटेल मध्ये जाणार आहेत त्या हॉटेल मध्ये वेश्याव्यवसाय चालतो का हे पाहणे महत्वाचे आहे जर असा प्रकार होत असेल तर आपण त्या ठिकाणी रूम घेऊ नये.
कारण तेव्हा आपल्याला कायदेशीर काही होऊ शकत नाही पण मनस्ताप सहन करावा लागू शकतो. कारण आपली ओळख पटवणे आपल्या घरातील सदस्यांना बोलण्याचा प्रकार हि घडू शकतो.
आता अनेक हॉटेल्स मध्ये अविवाहित जोडप्याना प्रवेश देण्याचा नियम आहे त्यामुळे आपण अशा हॉटेल्स मध्ये जाऊन सेक्स वैगेरे करायचा तर करू शकतो. हा सेक्स दोघांच्या मर्जीने असावा कारण आपल्याला पुढे कोणत्या कायदेशीर बाबी मध्ये अडकणार नाहीत. भारतीय कायद्यानुसार आपण खाजगी ठिकाणी अविवाहित असला तरीही राहू शकता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.