नुकताच कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. कारगिल युद्धाला २० वर्ष पूर्ण झाले आहेत. पाकिस्तानवर भारताने हा विजय मिळवला होता. या युद्धाचे अनेक जण जण हिरो राहिले. २० वर्षांपूर्वी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.
या युद्धामध्ये ५२७ भारतीयांना प्राण गमवावे लागले तर पाकिस्तानमधील मृतांचा आकडा ४५० इतका होता. या युद्धानंतर अनेक लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्या शौर्यासाठी सन्मानित करण्यात आले. भारतीय सुरक्षादलातील एकूण ९७ जणांना कारगिल युद्धातील कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. हातबॉम्ब फेकणारा सैनिक योगेंद्र सिंग यादव, १/११ गोरखा रायफल्स बाटलियनमधील लेफ्टनंट मनोज कुमार पांड्ये, १३ जेएके रायफल्स बाटलियनचे कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यासह अनेक शौर्यगाथा आजही मोठ्या उत्साहाने सांगितल्या जातात.
या युद्धातील असेच एक नाव होते. ते म्हणजे वीर चक्र विजेते सतपाल सिंह. कारगिल युद्धात सतपाल यांचीही महत्वाची भूमिका होती. त्यांनी पाकिस्तानच्या एका शूर सैनिकाला धारातीर्थी पाडले होते. सतपाल हे सैन्यात भरती झाले तेव्हा त्यांचे वय अवघे १८ वर्ष होते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांची ८ शीख बटालियनमध्ये पोस्टिंग झाली.
कारगिल युद्धात त्यांना टायगर हिल जिंकायचे आव्हान होते. डोंगराळ भाग होता. खालून वर जाऊन जिंकणे म्हणजे जिकरीचे काम होते. आणि तिथे ऑक्सिजन देखील कमी होता. तिथे सतपाल सिंह यांनी पाकिस्तानचा सर्वोच्च सैनिक पुरस्कार विजेता कर्नल शेर खानला धारातीर्थी पाडले.
वीरचक्र विजेत्या सतपाल सिंह यांच्या नशिबात आली ट्राफिक पोलिसांची नोकरी-
सतपाल सिंह सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते पोलीस दलात दाखल झाले. त्यांची सैन्यातील कामगिरी आणि पुरस्कार बघता त्यांना पोलीस दलात एखाद मोठं पद मिळायला हवं होतं. पण त्यांना अनेक वर्ष हेड कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करावी लागली. नुकतेच त्यांना ASI बनवण्यात आले आहे.
सतपाल सिंह यांचे वडील देखील सैन्यात होते. त्यांची इच्छा आहे कि आता त्यांच्या मुलाने देखील सैन्यात जावे. सतपाल सिंह यांनी मोदींना एक विनंती देखील केली आहे. १९६५, १९७१ च्या युद्धातील जे सैनिक पाकिस्तानच्या ताब्यात आहेत त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.