काल पासून चांद्रयान -२ ने अंतराळातून चित्रित केलेले पृथ्वीचे फोटो असा दावा करून दोन फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अनेकांनी हे फोटो शेअर करून तशा पोस्ट केल्या आहेत. पण हे दोन्ही फोटो चांद्रयान -२ मधून घेतले नसल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे असा दावा करणाऱ्यांच्या दाव्याला काहीही अर्थ नाही. हे फोटो जुनेच आणि डिजिटली तयार करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे.
काय आहे प्रकरण ?
गुवाहाटीच्या सज्जन सेठिया नावाच्या फेसबुक युजरने एक फोटो फेसबुकवर टाकून दावा केला होता की हा फोटो चांद्रयान -२ ने काढण्यात आला आहे. त्या फोटोला फेसबुकवर २५०० हुन अधिक लोकांनी शेअर केले आहे.
पश्चिम बंगाल मधील राष्ट्रीय तृणमूल काँग्रेसचे राज्य सचिव सरूप चट्टोपाध्याय यांनीही वेगवगेळ्या अँगलमधून काढलेले पृथ्वीचे जवळपास अर्धा डझन फोटो चांद्रयान -२ चित्रित असल्याचा दावा करून शेअर केले आहेत. बिलाल खान नावाच्या ट्विटर युजरने असाच एक फोटो शेअर केला आहे.
पण वास्तव काय आहे ?
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) यांनी २२ जुलै रोजी लाँच केलेले चंद्रयान -२ सप्टेंबरच्या सुरूवातीला चंद्राच्या कक्षेत स्थिर होईल असा अंदाज आहे. म्हणून चांद्रयान -२ द्वारे क्लिक करण्यात आल्याचा दावा केलेल्या सर्व प्रतिमा आणि छायाचित्र केवळ जुनेच नाही, तर डिजिटली तयार करण्यात आले आलेत.
त्यातला एक फोटो २००८ मधील नासाच्या संकल्पनात्मक फोटो लॅबचा आहे, जी ज्ञान आणि मनोरंजनासाठी ऍनिमेशन आणि व्हिज्युएल इफेक्ट तयार करते. तर दुसरा फोटो नासाने २००९ मध्ये घेतलेल्या रशियातील कुरील बेटावरच्या सारीचेव्ह ज्वालामुखीचा प्रारंभिक टप्प्यातील स्फोटाचा आहे. यापेक्षा हे फोटो चुकीचे असल्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे अद्याप इसरोने आपल्या वेबसाईटवर असे कुठलेही फोटो शेअर केले नाहीत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.