प्राण्यांना आपण सर्कसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करताना बघत असतो. पूर्वीच्या काळात सर्कस मोठ्या प्रमाणात असायचे. त्यामध्ये विविध गमतीजमती बघायला मिळायच्या. आजकाल ते फार कमी प्रमाणात बघायला मिळते. हे आठवण्याचे कारण म्हणजे सध्या एक व्हायरल झालेला व्हिडीओ.
सोशल मीडियावर गायीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असणारी हि गाय चक्क फुटबॉल खेळताना दिसत आहे. तुम्ही कधी फुटबॉल खेळणारी गाय पाहिलीय? ऐकलीय? नाही ना? चला तर बघूया फुटबॉल खेळणारी गाय.
हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल माहिती नाहीये पन हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हॉट्स अपवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ क्रिकेट कॉमेंट्री देणाऱ्या हर्षा भोगले यांनी ट्विटरवर शेअर केला आणि तो जगभरात पोहोचला.
या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मुलं फुटबॉल खेळताना दिसत आहेत. पण, काही वेळानंतर बॉल गायीच्या पायात जातो. काही वेळानंतर एक मुलगा गायीच्या पायातून बॉल काढून घेण्यात यशस्वी होतो. त्यानंतर मात्र, ती गाय फुटबॉलसाठी मैदानावर चकरा मारताना दिसत आहे. गायीच्या या कृत्यानं त्यावेळी मैदानावर उपस्थित प्रत्येकाला हासू आवरले नाही. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हीही पोट धरून हसाल..
बघा व्हिडीओ-
This is the funniest thing you will see today! pic.twitter.com/Kfz08Dka3Z
— Harsha Bhogle (@bhogleharsha) July 1, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.