उत्तराखंड मधील केदारनाथ आणि तामिळनाडू मधील रामेश्वरम या दोन प्रमुख ज्योतिर्लिंगाच्या मध्ये भारतातील पाच प्रमुख शिवमंदिरे वसली आहेत. या मंदिरांच्या निर्माणाचे रहस्य जाणून तुम्ही हैराण व्हाल, कारण ते रहस्य इतके वैज्ञानिक वाटते की खुद्द वैज्ञानिकही हैराण आहेत. ज्याकाळात अक्षांश आणि रेखांश या संकल्पना माहीतही नव्हत्या.
त्याकाळात केदारनाथ पासून रामेश्वरम पर्यंत जवळपास २३८३ किमी अंतरादरम्यान भौगोलिकरीत्या समांतर रेषेत ७ शिवमंदिरे उभी आहेत. 79°E,41’,54” या रेखांशावर ही ७ मंदिरे स्थित असून त्या रेषेला शिव शक्ती अक्ष रेषा म्हणून ओळखले जाते. पाहूया या मंदिरांचे रहस्य…
१) केदारनाथ : देव आणि दानवांतील युद्धापासून पांडवांपर्यंत या ज्योतिर्लिंगाची कथा जुळते. उत्तराखंड मध्ये असणारे हे एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे, ज्याला अर्धंज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरासोबत याला पूर्ण ज्योतिर्लिंग मानले जाते.
२) कालेश्वरम : तेलंगणाच्या करीमनगर भागात असणारे कालेश्वर मुक्तेश्वर स्वामी मंदिर तेलंगणामधील त्रिलिंगांपैकी एक आहे. मंदिराजवळून गोदावरी नदी वाहत असल्याने याला दक्षिण गंगोत्री मंदिर असेही म्हणतात. मंदिरात एकाचवेळी दोन लिंग असून एकाला शिव आणि दुसऱ्याला यम मानले जाते.
३) श्रीकालहस्ती : आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात असणाऱ्या याठिकाणी कोळी (श्री), साप९काल) आणि हत्ती (हस्ती) यांनी तपश्चर्या करून मोक्ष मिळवला होता, त्यामुळे हे मंदिर श्रीकालहस्ती मंदिर या नावाने ओळखले जाते. हे मंदिर दक्षिण कैलास आणि दक्षिण काशी नावाने ओळखले जाते.
४) एकंबरेश्वर : तामिळनाडूच्या कांचीपुरम मधील शिवमंदिर एकंबरेश्वर महादेव या नावाने ओळखले जाते. इथे देवी पार्वतीने वाळूचे शिवलिंग बनवून त्याची पूजा केली होती. इथे चमेलीच्या तेलाने शिवलिंगाला अभिषेक केला जातो.
५) अण्णामलैय्यर : तामिळनाडूच्या तिरुवन्नमलई येथील अरुणाचल पर्वतावर अरुणाचलेश्वर म्हणजेच अण्णामलैय्यर मंदिर स्थित आहे. असे मानले जाते की भगवान शंकर इथे अग्नीच्या रूपात प्रकट झाले होते. ब्रह्मा आणि विष्णूमध्ये श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यावरून इथे झालेला वाद शंकराने शांत केला होता.
६) तिलई नटराज : तामिळनाडूच्या चिदंबरम येथे नटराज स्वरूपात शंकराचे हे मंदिर स्थित आहे. मंदिराच्या भिंतीवर शंकराच्या नृत्याच्या मुद्रा आहेत. भगवान शंकर इथे ओंकाराचा रूपात आहेत असे प्राचीन काळापासून मानले जाते.
७) रामेश्वरम : तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर रामनाथ स्वामी म्हणजेच रामेश्वराचे मंदिर स्थित आहे. लंकेत जाण्यासाठी वानर सेना सेतू बनवण्याचे काम करत होती तेव्हा येथे रामाने वाळूचे शिवलींग बनवून त्याची पूजा केली होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.