२०१४ मध्ये भाजपने केंद्रात सत्ता मिळवली. मोदी लाटेत भाजपप्रणित NDA चे सरकार स्थापन झाले आणि तेव्हापासून भाजपचा विजयी प्रवास सुरु झाला तो आजपर्यंत थांबायचं नाव घेत नाहीये. भाजपने मागील ४-५ वर्षात देशभरात मोठा पक्ष विस्तार केला आहे. देशभरात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं तयार करण्यात भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे.
अनेक राज्यामध्ये भाजपने सत्ता काबीज केली. २०१९ च्या निवडणुकीत मोदी लाट ओसरली अशी सर्वांची भावना होती पण २०१४ पेक्षा मोठा विजय मिळवत केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आलं. भाजपचा हा यशाचा चढता आलेख बघून अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करत राहिले. २०१४ पासून देशभरात अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे. महाराष्ट्रात पक्षांतराची सुरुवात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली. २०१४ पासून अनेक मात्तबर नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. २०१४ पासून नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरु केली. पक्षांतराचा धडाका अजूनही सुरूच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मोठमोठी घराणी भाजपमध्ये गेली आहेत. अजूनही अनेक मोठे नाव भाजप शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रांगेत आहेत. राष्ट्रवादीतील आतापर्यंत २० मोठ्या नेत्यांनी भाजप शिवसेनेत प्रवेश केला असून अजून ९ नेत्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
नेत्यांच्या पक्षांतराची अनेक कारणं आहेत. यामधील प्रमुख कारण म्हणजे सत्तेत राहून अनेक गोष्टी साध्य होतात. सत्तेत राहण्यासाठीच हे नेते प्रवेश करत असल्याचे एकंदरीत चित्र दिसते. तर काही नेत्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यातून सुटका करायची असेल तर सत्ता हा पर्याय आहे. अनेक नेत्यांना आपल्या शिक्षणसंस्था, सुतगिरण्या, कारखाने यांच्यावर असलेला करोडोंचा कर्जाचा बोजा नियमित करायचा आहे.
राष्ट्रवादीतील या २० मोठ्या नेत्यांनी केला आतापर्यंत पक्षाला रामराम-
बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, राहूल कूल, किसन कथोरे, कपिल पाटील, सचिन अहिर, लक्ष्मन ढोबळे, निवेदिता माने, विनय कोरे, संजय सावकारे, प्रसाद लाड, लक्ष्मण जगताप, बाबासाहेब देशमुख, नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक, सुरेश धस, विजयकुमार गावीत, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील, पांडुरंग बरोरा
हे ९ नावे देखील पक्षांतराच्या तयारीत-
संग्राम जगताप, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, बबन शिंदे, संदीप नाईक, दिलीप सोपल, चित्रा वाघ, आणि शिवेंद्रराजे भोसले हे नेते देखील राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. चित्रा वाघ यांनी कालच आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून वैभव पिचड हे उद्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.