जिवंत व्यक्ती पाण्यात बुडतो मात्र मृत व्यक्ती म्हणजेच शव पाण्यावर तरंगते. असे नेमके कशामुळे होत असावे, हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? चला तर जाणुन घेऊया नेमक्या कोणत्या कारणामुळे शव पाण्यावर तरंगते आणि जिवंत माणुस बुडतो..
तुम्ही कधी एखाद्या प्लास्टिकच्या डब्ब्यात एखादी खाण्याची वस्तू टाकून तो डब्बा भरून ठेवा. ती खाण्याची वस्तू फक्त लवकर खराब होईल अशी असावी. तो भरलेला डब्बा नंतर पाण्यात टाकून ठेवा. तो डब्बा टाकल्यानंतर लगेच बुडेल. पण त्या डब्ब्यामधील अन्न जसं जसं खराब होईल तसा तो डब्बा पाण्यात तरंगू लागेल.
काही दिवसानंतर तो डब्बा फुटेल आणि त्यात जी गॅस बंद आहे ती बाहेर येईल. मनुष्याच्या शरीराचे देखील असेच असते. मेल्यानंतर शरीरात सडल्यामुळे गॅस तयार होतो. हा गॅस शरीराचे घनत्व कमी करतो आणि शरीराचे वजन कमी होऊन ते पाण्यावर तरंगते.
कोणतीही वस्तू पाण्यावर तरंगते म्हणजे तिचे घनत्व हे पाण्यापेक्षा कमी आहे. मृत व्यक्तीचे घनत्व हे जिवंत व्यक्तीपेक्षा कमी असते. याचे कारण म्हणजे मेल्यानंतर फुफुसात पाणी जाते. पाण्यात बॅक्टेरिया असतो आणि शरीरात देखील अगोदरच बॅक्टेरिया असतो. त्या बॅक्टेरियाने शरीर फुगायला सुरुवात होते.
कोणतीही वस्तू पाण्यात तेव्हाच डुबते जेव्हा ती आपल्या वजनाएवढे पाणी बाजूला हटवू शकते. जेव्हा पाण्यातील वास्तूचे वजन तिने हटवलेल्या पाण्यापेक्षा कमी होते तेव्हा ती वस्तू पाण्यावर तरंगते. मृत व्यक्तीचे शरीर फुगल्यामुळे आपल्या वजनाएवढे पाणी ते हटवू शकत नाही व ते पाण्यावर तरंगू लागते.
पाण्याचे विशिष्ट गुरुत्वाकर्षण हे १००० असते. ज्या वस्तूचे गुरुत्वाकर्षण पाण्यापेक्षा जास्त असेल ती वस्तू पाण्यात बुडेल. जेव्हा व्यक्ती जिवंत असतो तेव्हा तो श्वास घेतो आणि त्याच्या शरीराचे गुरुत्वाकर्षण जवळपास ०.९८५ असते. त्यामुळे तो पाण्यात बुडत नाही.
जर तो मृत असेल तर त्याच्या फुफुसात पाणी जाते आणि त्याचे विशिष्ट गुरुत्वाकर्षण हे १.०२६ होते. त्यामुळे तो बुडतो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.