सिनेमा बघण्याची आवड आजकाल कोणाला नसते. अगदी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच सिनेमा आवडतो. प्रत्येक जण कितीही बिझी असला तरी वेळ काढून सिनेमा बघतो. काही जणांना थिएटर मध्ये जाऊन सिनेमा बघण्याची सवय असते तर काहींना घरी टीव्हीवर सिनेमा बघण्याची आवड असते. सिनेमा बघून थोडं मन हलकं झाल्यासारखं होतं.
बऱ्याच जणांना फॅमिलीसोबत बसून सिनेमा बघण्याची सवय असते. बॉलीवूडमध्ये दरवर्षी हजारो सिनेमे तयार होत असतात. मराठीतही आजकाल भरपूर सिनेमे तयार होतात. मराठीत चांगले सिनेमे देखील प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. ज्याची संख्या मागील काही वर्षात चांगलीच वाढली आहे.
बॉलीवूड सिनेमे मोठ्या प्रमाणात वादात देखील अडकतात. याचे कारण म्हणजे त्यातील बोल्ड कंटेंट, आक्षेपार्ह भाषा आणि न्यूडिटी हे असते. अनेक सिनेमांच्या रिलीजवर सेन्सॉर बंदी आणतं असतं, तर काही सिनेमांमधील बोल्ड कंटेंटला कात्री लावण्यात येते. काही सिनेमांना बोल्ड कटेंटेमुळे अॅडल्ट (A) सर्टिफिकेट देऊन रिलीज करण्याची परवानगी दिली जाते. मात्र हे सिनेमे प्रेक्षक आपल्या कुटुंबीयांसोबत बसून बघू शकत नाहीत.
असेच हे दहा सिनेमे फॅमिलीसोबत बघून चुकूनही बघू नका-
१. जिस्म (सीरीज)-
अमित सक्सेना यांनी दिग्दर्शित केलेला पहिला भाग आणि पूजा भट दिग्दर्शित जिस्म २ हे सिनेमे चुकूनही फॅमिलीसोबत बघून बसू नका. जिस्मच्या पहिल्या भागात बंगाली ब्युटी बिपाशा बसू आणि बॉलिवूड हंक जॉन अब्राहम यांचे अनेक हॉट सीन्स आहेत. तर दुस-या भागात पॉर्न स्टारहून बॉलिवूड अॅक्ट्रेस बनलेल्या सनी लिओनीने अरुणोदय सिंहसोबत अनेक हॉट सीन्स दिले आहेत.
२. देव डी-
अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेला ‘देवदास’चे देव डी हे आधुनिक व्हर्जन तरुणाईला चांगलेच आवडले. पण आधुनिकतेच्या नावाखाली सिनेमात अनेक हॉट सीन्स टाकण्यात आले. सोबतच व्हल्गर भाषेचाही प्रयोग सिनेमात करण्यात आला.
३. हंटर-
हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित हंटर सिनेमा सेक्सचा शौकीन असणाऱ्या एका व्यक्तीवर आधारित आहे. अगदी वयाच्या 12-13 व्या वर्षीपासूनच त्याला शारीरिक संबंधाविषयीचे आकर्षण निर्माण होते. ब्लू फिल्म बघणे, तरुणींचा पाछलाग करणे आणि अनेक महिलांसोबत सेक्स संबंध बनवणे त्याचे काम असते.
४. हेट स्टोरी चे तीन भाग-
तिन्ही पार्टमध्ये सुडाची कहाणी वेगवेगळ्या अँगलने दाखवण्यात आली आहे. पण सोबतच सेक्स सीन्सचाही सिनेमांत भडीमार आहे. याच कारणामुळे हा सिनेमा कुटुंबीयांसोबत बसून बघणे शक्य होत नाही.
५. रागिनी एमएमएस-
रागिनी एमएमएसचे दोन भाग आले. पवन कृपलानी यांनी पहिल्या भागाचं दिग्दर्शन केलं तर भूषण पटेलने दुसऱ्या भागाचं. दोन्ही सिनेमे हॉरर धाटणीचे आहेत. पण सिनेमातील हॉट सीन्समुळे हा सिनेमा फॅमिलीसोबत बसून बघणे योग्य नाही.
६. बीए पास-
अजय बहल दिग्दर्शित बीए पास सिनेमात तरुण देहव्यापारात उतरलेला दाखवलेला आहे. सिनेमात बोल्ड सीन्ससोबतच असे काही सीन्स होते, ते प्रेक्षकांना मानसिकदृष्ट्या त्रासदायक होते.
७. मस्ती सर्व भाग-
इंद्र कुमार दिग्दर्शित मस्ती, ग्रँड मस्ती आणि ग्रेट ग्रँड मस्ती, तिन्ही सिनेमांचा कंटेंट अतिशय बोल्ड आहे. रितेश, विवेक, आफताब हे त्रिकुट आपल्या धमालमस्तीद्वारे प्रेक्षकांना हसवण्यात यसश्वी ठरले. मात्र त्यांच्या या सिनेमांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. हा सिनेमा फॅमिलीसोबत चुकूनही बघू नका.
८. गँग्स ऑफ वासेपुर-
अनुराग कश्यप दिग्दर्शित गँग्स ऑफ वासेपुर सिनेमा चांगलाच हिट झाला. पण या सिनेमात बोल्ड सीन्स आणि शिवीगाळ खूप आहे. त्यामुळे फॅमिलीसोबत हा सिनेमा बघू नका.
९. लव्ह सेक्स और धोका-
दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित लव्ह सेक्स और धोका सिनेमात बोल्ड सीन्सचा भडीमार असूनदेखील लोकांनी त्याला पसंतीची पावती दिली. मात्र कुटुंबासोबत बसून हा सिनेमा बघू नका. नाहीतर लाजिरवाणे होण्याची वेळ येईल.
१०. जुली-
दीपक शिवदसानी यांनी दिग्दर्शित केलेल्या जुली मध्ये अनेक हॉट सीन्स आहेत. नेहा धुपियाने या सिनेमात अनेक हॉट सीन्स दिले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.