पावसाळा आला, की आनंद होतो खरा; परंतु त्याच वेळेस काही गोष्टी चिंतेत टाकणाऱ्या देखील असतात. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याची समस्या उद्भवते आणि त्यामुळेच अतिसारासारख्या रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. पावसाळ्यात माश्या-मच्छरांचाही त्रास वाढतो. लहान मुलांना पावसाळ्यात आजार होण्याची शक्यता जास्त असते.
माशा आणि मच्छर आजारांना जास्त कारणीभूत ठरतात. माश्या बाहेरून घरात रोगजंतू घेऊन येतात. अन्नावर, पाण्यावर बसल्या की त्याने आपल्याला रोगांचा सामना करावा लागतो. यामुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस यांचा धोका वाढतो. अशात यापासून कसे वाचावे किंवा या माश्यांपासून सुटका कशी मिळवावी यासाठी काही खास टिप्स बघुयात..
पावसाळ्यात माशा होणे स्वाभाविक आहे. पण माशा झाल्या तर चिंता करण्याचे कारण नाही. काही अशा टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही माशांपासून सुटका करून घेऊ शकता. माशा चावत नसल्या तरी त्या अंगावर बसल्याने त्रास होतो.
माशांपासून सुटका करण्यासाठी स्वच्छता महत्वाची-
माशा या स्वच्छता नसेल तर जास्त प्रमाणात वाढतात. बऱ्याचदा किचनमध्ये अस्वच्छता असते त्यामुळे किचनमध्ये जास्त माशा होतात. यावर उपाय म्हणजे किचनमध्ये काहीही घाण ठेवू नये. किचन सतत स्वच्छ करत रहावं. उघड्यावर खाण्याच्या वस्तू ठेवू नये. ब्लिच बेस्ड किंवा क्लोरिन बेस्ड क्लिनर्सने ओटा स्वच्छ ठेवा.
अन्न सांडल्याने बऱ्याचदा घाण होते. ती घाण वेळीच स्वच्छ करा. अन्न सांडवू नका सांडल्यास ती जागा स्वच्छ धुवून घ्या. अन्न देखील उघड ठेवू नका. आपण कचरा देखील कधी कधी उघडा ठेवतो. पण घरातील कचरा उघडा ठेवू नका.
खिडक्या दारं बंद करा-
पावसाळ्यात शक्यतो घराच्या खिडक्या आणि दारं बंद ठेवा. बाहेरून आल्यावर पाय निट स्वच्छ धुवा. किंवा खिडक्यांना जाळी, मच्छरदाणी लावा. यामुळे तुम्ही खिडक्या अधिक वेळ उघड्या ठेवू शकता.
इंसेक्ट रेपेलंट स्प्रे मारा-
घरात कीटकांचा वावर कमी करण्यासाठी इंसेक्ट रेपेलंट स्प्रे मारा. मात्र त्याचा वापर करताना घरातील लहान मुलं तसेच खाण्याचे पदार्थ दूर ठेवा. बाजारात आणखीही काही केमिकल्स मिळतात ते वापरा. पण लहान मुलांना त्यापासून दूर ठेवा.
घरगुती उपाय देखील ठरतील उपयुक्त-
कापूर, तुळस, कडूलिंब, तेल : धार्मिक कार्यामध्ये कापूर वापरला जातो. संध्याकाळी धूपासोबत कापूर जाळल्यास माश्या कमी होतात. घरात चारही कोपर्यात कापराच्या गोळ्या टाका. माश्या खूप असतील तर कापूर जाळा. कापराच्या दर्पामुळे माश्या कमी होण्यास मदत होते. घरा-घरात किमान तुळशीचं रोप जरूर आढळतं. तुळशीमधील औषधी गुणधर्मासोबत कीटकांना दूर ठेवण्याची क्षमतादेखील आहे.
घरात तुळशीचे रोप लावा त्यामुळे माशांचा वावर कमी होतो. निलगिरी, लव्हेंडर, पेपरमिंट, गवती चहा यासारखी नैसर्गिक गोष्टी देखील माशा पळवून लावण्यास उपयुक्त ठरतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.