बहीण भावाचं नातं खूप प्रेमाचं आणि भावनिक असतं.बहीण भावांनी एकमेकांच्या सुखासाठी काही गोष्ट करणे तसे काही नवीन नाही. ब्रिटनच्या कुम्ब्रिया प्रांतात राहणाऱ्या एका स्त्रीने तिच्या सख्ख्या भावाच्या मुलाला जन्म दिला आहे. ही महिला सेरोगसी पद्धतीने गरोदर राहिली होती. पण तिने हे का केलं हे वाचून तुम्ही थक्क व्हाल. जाणून घेऊया यामागचं कारण..
ब्रिटनच्या कुम्ब्रिया प्रांतात राहणाऱ्या चॅपेल कूपर हिने आपल्या भावाच्या मुलाला जन्म दिला आहे. सरोगसी पद्धतीने तिने आपल्या भावाच्या मुलाला जन्म दिला आहे. खरंतर एवढं वाचून आपल्याला प्रश्न पडू शकतात. पण यामागचे खरे कारण समजल्यावर धक्का बसतो. तिने आपल्या भावाच्या सुखासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.
चॅपेल कूपर हि २७ वर्षाची असून तिचा भाऊ गे असून समलिंगी रिलेशनशिपमध्ये आहे. पण त्याला एका बाळाचं पालकत्व स्वीकारायचं होतं. यासाठी त्याला सरोगसी हा पर्याय होता. त्याला सरोगसीसाठी बहीणच योग्य पर्याय वाटली. सरोगिसीसाठी दुसऱ्या कोण्या महिलेवर विश्वास ठेवणे त्याला पटत नव्हते.
बहिणीनेही त्याला होकार दिला आणि त्याच्यासाठी सेरोगसी पद्धतीने गरोदर राहण्याचा निर्णय घेतला. चॅपेल कूपर स्वतः एका मुलीची आई आहे. आता ती भावाच्या मुलाला जन्म देऊन त्याची बायोलॉजिकल आईदेखील झाली आहे. कूपर स्वतः आई असूनही हा निर्णय तिने भावाच्या सुखासाठी घेतला.
भाऊ स्कॉट स्टीफन्सन याने तिचे आभार मानणारी एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे. त्याने याबद्दल सांगितले कि सरोगसी आणि मूल दत्तक घेताना होणाऱ्या अडचणी त्याचसोबत होणारा खर्च जास्त होता. ही बाब लक्षात घेऊन कूपरने आई होण्याचा निर्णय घेतला.
कूपरच्या या निर्णयामुळे तिचा भाऊ स्कॉट स्टीफन्सन आणि गे जोडीदार माइकल स्मिथ यांना पालकत्व मिळाल्यानं हे जोडपं खूप आनंदी आहे. फर्टिलायझेशन प्रक्रियेसाठी चॅपेल कूपरचे एग सेल आणि मायकल स्मिथच्या स्पर्मचा वापर करण्यात आला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.