पंतप्रधान मोदी यांचे काही फोटो आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. मोदींचे फोटो व्हायरल होणे हि काही नवीन गोष्ट नाही. पण या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मोदींचा एक छोटी मैत्रीण दिसत आहे. एका गोंडस चिमुरडीसोबतचे मोदींचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. मोदींनी त्यांच्या फेसबुक आणि इस्टाग्रामवरुन फोटो शेअर करताना चिमुरडीला ‘स्पेशल फ्रेंड’ म्हटलं आहे.
मोदींनी आज संसदेत एक स्पेशल फ्रेंड भेटायला आल्याचे म्हंटले आहे. मोदींनी या चिमुरडीसोबत बराच वेळ घालवला. मोदी या चिमुरडीसोबत बराच वेळ खेळले. समोरच्या टेबलवर चॉकलेट ठेवलेले होते ते चॉकलेट ती चिमुरडी घेण्याचा प्रयत्न करते.
फेसबुक इंस्टाग्रामवर लाखो लोकांनी हे फोटो लाईक आणि शेअर केले आहेत. लोकांना हा चिमुकला खूप आवडला असून कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
कोण आहे हि चिमुरडी?
मोदींनी ‘स्पेशल फ्रेंड’ म्हटलेली हि चिमुरडी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सत्यनारायण जटिया यांची नात आहे. सत्यनारायण जाटिया हे यापूर्वी उज्जैनचे खासदारही होते, शिवाय त्यांनी केंद्रात मंत्रिपदही सांभाळलेलं आहे.
पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही परदेश दौऱ्यावर असताना लहान मुलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात प्रोटोकॉल बाजूला ठेवून मोदी मुलांशी गप्पा मारताना दिसतात. आता या चिमुरडीचा फोटोही चांगलाच व्हायरल होतोय.
कामातून वेळ काढत मोदींनी या चिमुरडीसोबत काही वेळ घालवला. यावेळी रामशेठ जातीय यांचा मुलगा आणि सूनही उपस्थित होते. मोदी यापूर्वीही सार्वजनिक कार्यक्रमात प्रोटोकॉल बाजूला ठेवून लहान मुलांशी गप्पा मारताना दिसले आहेत. मोदींनी याआधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला होता. त्यात त्यांनी एका लहान मुलीचे कान धरले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.