आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघ निवडीच्या एक दिवस आधी एक दिवस महेंद्रसिंग धोनीने स्वतःच या दौऱ्यातून माघार घेतली आहे. या दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे धोनीने दोन महिन्यांचा मोठा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे संघाची निवड व्हायच्या एक दिवस आधीच धोनीने BCCI ला तसे कळवले होते. या दोन महिन्यांसाठी धोनीचा काय प्लॅन असणार आहे ते बघूया…
धोनी दोन महिने या ट्रेनिंगसाठी काश्मीरला जाणार
आपल्याला माहित असेलच २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीला प्रादेशिक सैन्यदलामध्ये मानद लेफ्टनंट पदवी प्राप्त आहे. त्यासाठीच धोनी पुढचे दोन महिने आपल्या पॅराशूट रेजिमेंटसोबत घालवणार आहे. सेनाप्रमुख रावत यांनीही याला मंजुरी दिली आहे.
पुढील दोन महिने धोनी पॅराशूट रेजिमेंटमध्ये ट्रेनिंग घेईल. धोनीची १०६ इन्फन्ट्री बटालियन सध्या स्टॅटिक ड्युटीसाठी काश्मीरमध्ये तैनात असल्याने धोनीचे ट्रेनिंग काश्मीरलाच होण्याची शक्यता आहे. या दरम्यान सैन्याच्या कुठल्याही मोहिमेवर धोनीला जाता येणार नाही.
क्रिकेट सोडल्यानंतर धोनी करणार सैन्यात काम
महेंद्रसिंग धोनीचे भारतीय आर्मीवर असणारे प्रेम जगजाहीर आहे. धोनीला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा तो आपल्या रेजिमेंटमध्ये ट्रेनिंगसाठी जात असतो. धोनीने अनेकदा सांगितले आहे की तो जर क्रिकेटमध्ये आला नास्ता, तर भारतीय आर्मीत गेला असता. धोनीचे टीशर्ट, ट्राऊजर, कॅप, ग्लोव्ह्ज एवढेच काय बॅगसुद्धा आर्मीच्या रंगाची असते. क्रिकेट सोडल्यानंतर आपण भारतीय आर्मीत आपल्या रेजिमेंटमध्ये पूर्णवेळ काम करणार असल्याचे धोनीने सांगितले आहे.
यापूर्वीही धोनीने घेतले आहे ट्रेनिंग
धोनीने यापूर्वी ऑगस्ट २०१५ मध्ये आग्र्याच्या “पॅरा ट्रेनिंग स्कुल” येथे स्पेशल फोर्स सोबत एक महिना ट्रेनिंग घेतलेले आहे. धोनीने त्यावेळी सेनेच्या जवानांची पॅरा ट्रूपरची ट्रेनिंग घेतली होती. या दरम्यान ट्रेनिंगमध्ये पास होण्यासाठी पाच पॅरा जंप सुद्धा घेऊन दाखवल्या होत्या.
धोनीची पाचवी जंप १२५० फूट उंचावरून घेण्यात आली होती. धोनीला त्या दरम्यान सेनेच्या वतीने एक जिप्सी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.