भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) आज जगातील सर्वात विश्वसनीय अवकाश संस्था आहे. जगभरातील जवळपास ३२ देश ईस्रोच्या रॉकेटच्या साहाय्याने आपले उपग्रह अवकाशात लाँच करतात.
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीतून आणि डॉ.विक्रम साराभाई यांच्यासारख्या शास्त्रज्ञांच्या योगदानातून नावारूपाला आलेल्या या संस्थेत अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी आणि तत्कालीन सरकारने मोलाची मदत केली आहे. आज ईस्रोच्या इतिहासातील त्या घटना पाहणार आहोत, ज्याने जगाला भारताची दखल घ्यायला भाग पाडले…
१) सर्जिकल स्ट्राईकमध्ये ईस्रोची महत्वपूर्ण भूमिका
पाकिस्तान मधील दहशतवाद्यांनी जेव्हा जेव्हा भारताच्या सीमाभागात घुसखोरी करून घातपाती कारवाया केल्या तेव्हा तेव्हा ईस्रोने भारतीय सेनेची मदत केली. २०१६ मध्ये पाकिस्तानव्याप्त उरीमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक केला, तेव्हा ईस्रोनेच आतंकवाद्यांचे तळ शोधून त्याची माहिती भारतीय सेनेला पुरवली होती. २०१९ च्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईक मध्येही ईस्रोने याचप्रकारे मदत केली.
२) रशियाने नकार दिला तेव्हा स्वतःच बनवले चांद्रयान-२ साठी लॅन्डर-रोव्हर
नोव्हेम्बर २००७ मध्ये रशियन अवकाश संस्था रॉसकॉसमॉसने चांद्रयान-२ प्रोजेक्टसाठी लॅन्डर देऊन सोबत काम करणार असल्याचे सांगितले होते. मनमोहनसिंग प्रधानमंत्री असताना त्यांनी २००८ मध्ये प्रोजेक्टला मान्यता दिली. २००९ मध्ये प्रोजेक्टचे डिझाईन तयार करण्यात आले.
जानेवारी २०१३ मध्ये लाँचिंग होणार होती, पण रॉसकॉसमॉस लॅन्डर देऊ शकली नाही. त्यानंतर ईस्रोच्या भारतीय शास्त्रज्ञांनी कुठल्या परदेशी मदतीशिवाय स्वतःचे तंत्रज्ञान विकसित केले आणि नवीन लॅन्डर-रोव्हर बनवले.
३) एकाचवेळी १०४ उपग्रह सोडण्याचा विश्वविक्रम
१ फेब्रवारी २०१७ रोजी ईस्रोने PSLV-C37 च्या मदतीने कार्टोसॅट-2 या भारतीय उपग्रहासोबतच विविध देशांचे १०३ असे एकूण १०४ उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम करून दाखवला होता. भारतानंतर एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह अंतराळात पाठविण्यात रशियाचे नाव येते, त्यांनी २०१४ मध्ये ३७ उपग्रह एकाच वेळी पाठवले होते. याची तुलना करता भारताने अवकाश विज्ञानात किती मोठी कामगिरी करून दाखवली याचा प्रत्यय येतो.
४) पहिल्या प्रयत्नातच मंगलयान मोहीम यशस्वी झाली
५ नोव्हेम्बर २०१३ रोजी भारताने मार्स ऑर्बिटर मिशन (मंगलयान मोहीम) लाँच केली. जगात भारत हा एकमेव असा देश आहे ज्याने पहिल्या प्रयत्नातच मंगलयान मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. भारताच्या आधी रशिया, अमेरिका आणि युरोपियन स्पेस एजन्सीने मंगलयां यशस्वी केली आहे.
मात्र त्यापैकी कुणालाच पहिल्या प्रयत्नात ही कामगिरी करता आली नव्हती. तसेच भारताची मंगलयान मोहीम इतरांच्या तुलनेत जगातील सर्वात स्वस्त मोहीम ठरली.
५) चांद्रयान-१ मोहिमेने दिले चंद्रावरील पाण्याचे पुरावे
ईस्रोने २२ ऑक्टोबर २००८ रोजी PSLV प्रक्षेपकाच्या साहाय्याने भारताची पहिली चांद्रयान११ मोहीम लाँच केली. ३१२ दिवस या यानाने ईस्रोला चंद्रावरील माहिती आणि फोटो पाठवले. त्याच्या आधारे भारताने जगाला पुराव्यासहित सांगितले की चंद्राच्या ७० ते ८० डिग्री अक्षांश ध्रुवीय भागात पाण्याचे कण अस्तित्वात असल्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकी अवकाश संस्था नासाने भारताच्या या दाव्याची पुष्टी केली आहे. भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.