दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे काल दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. दिल्लीतल्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्या ८१ वर्षांच्या होत्या. शीला दीक्षित तब्बल १५ वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. तसेच काही महिने त्यांनी केरळचे राज्यपालपददेखील भूषवले होते.
लहानपणी नेहरुंना भेटायला गेलेली शीला ३२ वर्षानंतर बनली काँग्रेसमधील प्रभावी व्यक्तिमत्व-
ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा बॉलिवूड सितारा देवानंद भारतीय तरुणींच्या हृदयावर राज्य करत होते. गोल्ड स्पॉट या पहिल्या फिजी ड्रिंकने भारतीय बाजारात प्रवेश केला होता. टेलिव्हिजनची अजून सुरुवातही झाली नव्हती. रेडिओवरही काही तासांसाठीच कार्यक्रम ऐकायला मिळत होते. अचानक एके दिवशी १५ वर्षांच्या शीला कपूर नावाच्या एका मुलीने ठरवलं की आपल्याला प्रधानमंत्री नेहरूंना भेटण्यासाठी त्यांच्या “तिनमुर्ती” इथल्या निवासस्थानी जायचे आहे.
ती मुलगी “डुप्ले लेन” मधील आपल्या घरून पायी चालतच तीनमूर्ती भवनला पोचली. गेटवर पोहोचताच तिला दिसले की नेहरू त्यांच्या पांढऱ्या अँबेसिडर गाडीत बसून गेटमधून बाहेर पडत होते. त्या मुलीने नेहरूंना हात केला, नेहरूंनीही गाडीतून हात हलवून तिला उत्तर दिले.
त्या मुलीला त्यावेळी स्वप्नातही वाटले नसेल आज ज्या नेहरूंना आपण गेटवरून हात दाखवला, ३२ वर्षानंतर त्याच नेहरूंच्या नातीच्या मंत्रिमंडळात हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवून महत्वाची काँग्रेस सदस्य बनण्याची संधी मिळेल. पाहूया शीला दीक्षित यांच्या या प्रवासाबद्दल…
इंदिरा गांधींना जिलेबी आणि आईस्क्रीम खायला घालणाऱ्या शीला दीक्षित
शीला दीक्षित यांचे सासरे उमाशंकर दीक्षित इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. एकदा त्यांनी इंदिराजींना आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रित केले. इंदिराजी आल्या. भोजनानंतर स्वतः शीला दीक्षित यांनी त्यांना गरमागरम जिलेबीसोबत व्हॅनिला आईसक्रीम खायला दिले. इंदिराजींना हा प्रयोग फार आवडला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी याची रेसिपी जाणून घेण्यासाठी आपल्या कुकला शीला दीक्षित यांच्याकडे पाठवले. तिथून इंदिराजींचा आणि शीला दीक्षित यांचा स्नेह वाढला.
इंदिराजींच्या हत्यानंतर सासऱ्याने शीला दीक्षितांना बाथरूममध्ये कोंडले
इंदिरा गांधी यांच्या हत्येवेळी राजीव गांधी ज्या विमानातून कोलकाताहुन दिल्लीला आले होते त्याच विमानात प्रणव मुखर्जी आणि आपल्या सासऱ्यांसोबत शीला दीक्षितही प्रवास करत होत्या. उमाशंकर दीक्षित त्यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल होत्ते. विन्सेंट जॉर्जच्या एका फोनवरून त्यांना इंदिराजींच्या हत्येची बातमी सर्वात आधी समजली. ही बातमी आता लगेच कुणाला कळू नये म्हणून त्यांनी शीला दीक्षितांना बाथरूममध्ये कोंडले आणि कुणाला याबद्दल सांगू नको अशी ताकीद दिली.
शीला दीक्षित सलग तीनदा दिल्लीच्या मुख्यमंत्री
राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात शीला दीक्षितांनी संसदीय कार्यमंत्री आणि नंतर प्रधानमंत्री कार्यालयात राज्यमंत्री म्हणून काम केले. १९९८ मध्ये सोनिया गांधींनी शीला दीक्षितांना दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनवले. त्यानंतर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. शीला दीक्षित सलग तीनदा दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या.
दिल्ली मेट्रो, सीएनजी आणि दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी हिरवीगार दिल्ली ही मोठी कामे त्यांच्या काळात झाली. त्यांनी दिल्लीच्या शाळेतच मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटप सुरु केले. ट्रीपची आयआयटी स्थापन केली. “शीला दीक्षित : सिटीजन दिल्ली माय टाईम्स माय लाईफ” हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.