१९८५ च्या एका दुपारीच शीला दीक्षित नावाच्या व्यक्तीने जगाचा निरोप घेतला असता. कुणाच्यातरी भुकेने त्यांचा जीव वाचवला. ऑपरेशन ब्लु स्टार, इंदिरा गांधींची हत्या आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती यामुळे पंजाब अशांत होता.
शरद पवारांच्या मध्यस्थीने जुलै १९८५ मध्ये राजीव गांधी आणि संत हरचरण लोंगोवाल यांच्या पंजाब शांतता करार झाला. लोकांना वाटले आता परिस्थिती पूर्वपदावर येईल. पण अचानक ऑगस्ट १९८५ मध्ये लोंगोवाल यांची हत्या झाली. महिन्यानंतरच पंजाब विधानसभा निवडणुका होत्या. शीला दीक्षित यांच्यावर पंजाबमधे इलेक्शन कॅम्पेनिंगची जबाबदारी होती.
निवडणूक प्रचाराचा तो शेवटचा दिवस
पंजाब विधानसभा निवडणुकांचा प्रचार पूर्ण झाला. शेवटच्या दिवशी रॅली संपन्न झाली. बिहारच्या एका काँग्रेस नेत्याच्या गाडीत बसून शीला दीक्षित बटाला वरुन अमृतसरला रवाना झाल्या. त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक होता. दुपार झाली.
ड्रॉयव्हरने एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी कार थांबवली. ड्रॉयव्हर बोलला, “आताच जेवण करूया, नाहीतर अमृतसरला पोहोचेपर्यंत बराच उशीर होईल.” शीला दीक्षित गाडीतून उतरल्या आणि हॉटेलमध्ये जाऊन बसल्या. त्यांनी थंड पेय मागवले.
आणि तेवढ्यात बाहेर बॉम्बस्फोट झाला…
शीला दीक्षितांनी मागवलेल्या थंड पेयाचा पहिला घोट त्यांच्या घशाखाली उतरला नव्हता, तितक्यात एक जोरदार आवाज झाला. एक जोरदार धमाका झाला. त्याच कारमध्ये ज्यात बसून शीला दीक्षित बटालाहुन अमृतसरला निघाल्या होत्या. कारचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. ड्रॉयव्हरने दुपारच्या जेवणासाठी जर कार थांबवली नसती तर शीला दिक्षीतांसोबतच इतर तीन लोकांचाही जीव गेला असता. त्यावेळी हे चौघेजण तर वाचले, मात्र कार जवळ खेळणाऱ्या दोन लहान मुलांचा मात्र जीव गेला.
कारमध्ये केला होता बॉम्ब फिट
पोलिसांनी नंतर तपस केल्यावर समजले की कारमध्ये टाइम बॉम्ब फिट करण्यात आला होता. या धमक्याची भीती, स्फोटाचा आवाज, आदींचे ठिकऱ्या उडालेले चित्र आणि त्यात मारली गेलेली दोन लहान मुले हे सगळं शीला दीक्षितांच्या कायम स्मरणात राहिले.
१९८५ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, पण शीला दीक्षितांनी आपल्यावर आलेली कॅम्पेनिंगची जबाबदारी टाळली नाही. या घटनेच्या १३ वर्षांनंतर शीला दीक्षितांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.