डिसेंबर महिना हा तसा गोव्यातील सर्वात व्यस्त काळ असतो. पूर्ण देशातून आणि विदेशातूनही ख्रिसमस साजरा करण्यासाठी लोक गोव्याच्या किनाऱ्यांवर गर्दी करतात. त्यामुळे गोव्यात सर्वत्र सगळ्या वस्तूंचे दरही वाढलेले असतात. डिसेंबर सोडा, इतर वेळीही गेलात तरी तुमच्या खिशाला कात्री बसतेच. गोव्याला गेलात आणि एन्जॉय केला नाही असे होऊ शकत नाही. म्हणून आज आपल्याला अशा युक्त्या सांगणार आहोत, ज्याने कमी बजेटमध्ये तुम्हाला गोव्याचा जास्तीत जास्त आनंद लुटता येईल.
१) राहण्यासाठी सोयीस्कर जागा निवडा
गोवा उत्तर दक्षिण असा १५० चौकिमी क्षेत्रात पसरला आहे. रोज एका जागेहून दुसरीकडे जायचे म्हणले की तुमचा वेळ आणि पैसा जाणार. म्हणून राहण्यासाठी गोव्याचा असा भाग निवडा जिथून रात्री पार्टी करण्यासाठी जायचे असल्यास किंवा बीचवर जाऊन बियर प्यायची असल्यास तुमचा वेळ आणि पैसे वाचेल.
२) पूर्ण सुट्टीसाठी एकदाच राहण्याची बुकिंग करू नका
ज्या दिवशी गोव्यात याल त्यादिवशी तुमची राहण्याची बुकिंग केली तरी चालेल, पण बाकीच्या दिवसांसाठीही एकदाच बुकिंग करू नका. जरा पायी फिरून चौकशी करा. आसपास हॉटेलपेक्षा अत्यंत कमी दरात व्यवस्थित सुविधा असणारी ठिकाणे राहण्यासाठी मिळतील.
३) जास्तीत जास्त पायी चाला
गोव्यात दळणवळणाची सरकारी वाहने कमी आहेत. ऑटोरिक्षांचेही दर जास्त आहेत. नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान इथला मौसम खूपच मोहक असतो. त्यामुळे तुम्ही आरामात पायी फिरू शकता आणि गोव्याच्या निसर्गाचा अनुभव घेऊ शकता.
४) लांब फिरण्यासाठी स्कुटी बुक करा
पायी फिरायचे नसल्यास स्कुटी हा चांगला पर्याय उपलब्ध आहे. गर्दीच्या काळातही तुम्हाला २५० ते ३५० रुपयांमध्ये स्कुटी भाड्याने मिळेल. पेट्रोलचा खर्च आपण करावा लागेल. पण कॅबच्या तुलनेत स्कुटीवर मोकळ्या वातावरणात फिरण्यात पैशाचीही बचत होते.
५) पैसे नेहमी सोबत ठेवा
बहुतांश ठिकाणी कार्ड पेमेंट होत नाही. तसेच ऑनलाईन पेटीएम, गुगल पे, फोन पे सारखी सुविधाही सगळीकडे उपलब्ध नाही. ATM सुद्धा सहजासहजी सापडत नाहीत. त्यामुळे आधीच पैसे काढून आपल्यासोबत ठेवत जा.
६) एखाद्या जुगाडू व्यक्तीसोबत मैत्री करा
तिथल्या स्थानिक व्यक्तींना लोक, ठिकाणे आणि वस्तूंबद्दल चांगली माहिती असते. त्यामुळे अशा लोकांसोबत मैत्री करा. हे लोक तुम्हाला सामान्य किमतीपेक्षा कमी दरात वस्तू घेऊन देतील. चांगल्या हॉटेलमध्ये नेतील. अशी व्यक्ती शोधायला थोडी मेहनत घ्यावी लागेल, पण सापडली तर तुमची लॉटरी लागली समजा.
७) दारू हॉटेल ऐवजी ठेक्यांवरून घ्या
हॉटेल किंवा शॉप मधून दारू, बियर महाग मिळते. त्याऐवजी ठेक्यांवरून घेतल्यास ती स्वस्त पडते. तसेच ठेक्यांवर वेगवगळ्या प्रकारच्या बियरची चाखायला मिळते. मार्केटपासून लांब राहिला असाल तर एकदाच दारू किंवा बियर खरेदी करून ठेवा.
८) घासाघीस करून ताजे समुद्री भोजन मिळेल
ताजे समुद्रातील जेवण गोव्याला येणाचे चांगले कारण आहे. गर्दीच्या दिवसात त्याच्या किमती जास्त असतात. अशामध्ये तुमचे घासाघिस कौशल्य कामी येते. स्थानिक लोकांकडून तुम्हाला गर्दीपासून दूर चांगल्या भोजनालयांची माहिती मिळेल.
९) भोजनालय बदलण्यात हयगय करू नका
तुम्ही जिथे राहिलात तिथे एकाच भोजनालयात जेवण करावे अशी काही जबरदस्ती नाही. वेगवगेळी भोजनालय ट्राय करा. दारू एकीकडून घ्या, चकणा दुसरीकडून घ्या, जेवण तिसरीकडे करा. तुम्हाला त्या भागातील जेवणाच्या किमतीचाही अंदाज येईल.
१०) सकासकाळी खरेदी करा
उशिरा रात्री बाजार चालत असले तरी सकाळी स्थानिक बाजारातून वस्तू खरेदी केल्यास स्वस्त मिळतात. भवानीचे गिऱ्हाईक हा प्रकार तिकडेही असतो. त्यामुळे आपण घासाघीस करून कमी किमतीत वस्तू घेऊ शकता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.