पुणे-सोलापूर हायवेवर एर्टिगा कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कदम वाक वस्ती इथं ग्रामपंचायतीसमोर हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण दौंड तालुक्यातील यवत इथले रहिवसी होते.
दौंड तालुक्यातील यवतचे हे सर्व तरुण मित्र रायगडला फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्या या अपघाती मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. घरी परतत असताना मध्यरात्री एकच्या सुमारास काळाने त्यांच्यावर घाला घातला. सहलीचा आनंद घेऊन परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. हे नऊही तरुण पहिलीपासूनचे मित्र होते.
त्यांनी रायगडावरून निघाल्यानंतर हा शेवटचा फोटो काढला होता. मात्र हाच फोटो आता त्यांचा शेवटचा ठरला आहे. त्यांचा हा शेवटचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मित्रांपैकी तीन जण हे लोणी काळभोरमधील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. तर त्यातील दोन जण हे पुण्यातील जेएसपीएमएस कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.
पुणे-सोलापूर हायवेवर सोलापूरच्या दिशेने जाणार्या एर्टिगा या चार चाकी गाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने थेट दुभाजक ओलांडला आणि समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की एर्टिगामधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला.
‘रेडी टू गो’ स्टेट्स ठेवलं त्याच ठिकाणी काळाने घातला घाला-
यवतवरून निघाल्यावर या मित्रांपैकी एकाने लोणी काळभोरजवळ आल्यावर व्हाट्सअपला ‘रेडी टू गो’ असं स्टेटस ठेवलं. त्यानंतर ते पुढे फिरायला गेले. सहलीचा आनंद लुटला. भरपूर फोटो काढले. रायगडावरून परतीचा प्रवास सुरु झाला. लोणी काळभोर वरून त्यांचं गाव आता काही किलोमीटरच राहिले होते. पण ज्या ठिकाणी जाताना ‘रेडी टू गो’ स्टेटस ठेवलं होतं त्याच ठिकाणी परत येताना काळाने घाला घातला आणि ९ जणांचा मृत्यू झाला.
त्यांच्या निधनाने यवतवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या ९ मित्रांना खासरेकडून भावपूर्ण श्रद्धांजली.