विश्वचषकात दमदार कामगिरी केलेल्या भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाचे आव्हान न्यूझीलंडने पराभव करून संपुष्ठात आणले. विश्वचषकानंतर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या. विश्वचषकापूर्वीच धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चाना सुरुवात झाली होती.
पण विश्वचषक संपल्यानंतर पुन्हा या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत. पण धोनीचे लहानपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांना वाटते कि धोनीने अजून एक वर्ष क्रिकेट खेळावे. आणि २०२० मधल्या टी-२० वर्ल्डकपनंतर निवृत्तीची घोषणा करावी. केशव बॅनर्जी यांनी धोनीच्या निवृत्तीविषयी घरच्यांचे मत जाणून घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार धोनीच्या कुटुंबियांना वाटते कि धोनीने आता निवृत्ती घ्यावी आणि कुटुंबियांसोबत राहावे. त्याने रांचीमध्ये राहायला यावे.
भारतीय संघाची लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड होणार आहे. या दौऱ्यात धोनीची निवड होते का नाही याकडे सर्वांचे लक्ष्य होते. पण या निवडीपूर्वी धोनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे धोनीने निवृत्तीच्या दिशेने एक पाऊल टाकले असल्याचे बोलले जात आहे.
धोनीनं एक मोठा निर्णय बीसीसीआयला कळवला आहे. हे निवृत्तीच्या दिशेनं त्यानं टाकलेलं पहिलं पाऊल मानलं जातंय. महेंद्रसिंग धोनी पुढचे दोन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. या कालावधीत निमलष्करी जवानांसोबत ‘ऑन फिल्ड’ काम करायचं त्यानं पक्कं केलं आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिली.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड रविवारी होणार आहे. त्याआधी धोनीनं आपला निर्णय एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली यांना कळवला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.