भारतीय आर्मीचा जवान चंदू चव्हाण सुट्टीसाठी गावाकडे आला असताना त्याला ज्या पोलीस आणि राजकीय नेत्यांकडून ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली त्यावरून व्यथित होऊन त्याने भावनिक मत व्यक्त केले आहे. सैनिकाने मतदान करणे हा त्याचा अधिकार आह. जर आपल्याला मतदान करण्याचा अधिकार नसेल तर आपले नाव मतदार यादीत का ठेवता, ते काढून टाका असे भावनिक मत झालेल्या प्रकारावरून त्याने व्यक्त केले आहे.
कोण आहेत चंदू चव्हाण ?
चंदू चव्हाण हे मुळचे धुळे जिल्ह्यातल्या बोरविहीर गावातले रहिवासी आहेत. २०१२ मध्ये ते भारतीय आर्मीत भरती झाले होते. ते ३७ राष्ट्रीय रायफल्समधे ड्युटी करत आहेत. २८ सप्टेंबर २०१६ रोजी भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २९ सप्टेंबर रोजी चंदू चव्हाण नजरचुकीने भारतीय हद्दीतून पाकिस्तानी हद्दीत गेले होते.
तिथे पाकिस्तानी आर्मीने त्यांना अटक केले आणि पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने त्यांना दोषी धरत चार महिन्यांची शिक्षा दिली. जानेवारीत त्यांची सुटका करून भारतात आणण्यात आले. परवानगीशिवाय शस्त्र सोबत घेऊन चौकी सोडून गेल्याबद्दल भारतीय लष्करानेही त्याला दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती.
सुट्टीवर आलेल्या चंदू चव्हाणला पोलिसांनी बोलावले चौकशीसाठी
माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंनी चंदूला भारतात आणण्यासाठी आपले राजकीय वजन वापरले होते. लोकसभा निवडणुकांच्या काळात चंदू घरी आला असताना मतदान होणार होते. त्यावेळी चंदू चव्हाणने सुभाष भामरे यांचा प्रचार केल्याच्या आरोप करून त्याच्या विरोधात धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मागच्या काही दिवसांपूर्वी चंदू चव्हाण सुट्टीला घरी आला असता त्याला धुळे तालुका पोलिसांनी गुन्ह्याच्या चौकशीसाठी बोलावून घेतले.
चंदू चव्हाणचे भावनिक आवाहन
आपल्या चौकशीदरम्यान चंदूने सांगितले की, “आपण लोकसभा निवडणुकीच्या काळात सुट्टीवर आलो असताना मतदान करण्यासाठी बुथवर गेलो होतो. यात मी मतदान करण्यापलीकडे काहीही केलेलं नाही. माझ्या वडिलांनी फेसबुकवर कुठल्या राजकीय नेत्याच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टशी माझा काही संबंध नाही.
सुभाष भामरे आणि अनिल गोटे यांच्यात राजकीय कलह असल्याने माझ्या नावाचे भांडवल करून काही लोकांनी राजकीय द्वेषातून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, आम्हा सैनिकांना मतदान करण्याचा अधिकार नसेल तर आमचं नाव मतदार यादीतून काढून टाकावं”
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.