मागच्या महिन्यात “लागीर झालं जी” ला निरोप दिल्यानंतर झी मराठी आपल्या प्रेक्षकांना अजून एक धक्का देणार आहे. लवकरच अल्पावधीतच मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेल्या “तुला पाहते रे” या मालिकेचाही शेवट होणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागात काय घडणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्याबरोबरच आपली आवडीची मालिका आणि त्यातली पात्रे आता बघायला मिळणार नाहीत याचीही रुखरुख प्रेक्षकांमध्ये आहे.
आपल्या आवडत्या मालिकेबद्दल चार ओळी
तुला पाहते रे मालिका सुरु झाली तेव्हा तिचे कथानक पाहता एक अंदाज आला होता की ही मालिका कमी कालावधीची असणार आहे. सरंजामी कंपनीचे सर्वेसर्वा असणारे विक्रांत सरंजामे आणि अत्यंत सोज्वळ शांत स्वभावाच्या ईशा निमकर या दोघांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली.
नंतर मालिकेत एका वळणावर ईशाला विक्रांतचे पूर्वी लग्न झाल्याचे समजते आणि त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. पण नंतर ते पुन्हा जवळ येतात, त्यांचे लग्न होते. विक्रांतची पूर्वीची पत्नी राजनंदिनी पुनर्जन्म घेऊन ईशाच्या रूपात आल्यानंतर राजनंदिनीचा खून विक्रांतनेच केला असल्याचे उघड होते.
आता प्रेक्षकांमध्ये काय चर्चा सुरु आहे ?
मालिकेच्या सगळ्या भागांचे शूटिंग पूर्ण झाल्याच्या आनंदात साजऱ्या झालेल्या रॅप अप पार्टीचे फोटो ट्विटर इंस्टाग्राम फेसबुकवर त्याचे फोटोही झळकले आहेत. सुबोध भावेंनीही सगळ्या कलाकर मंडळींना व्यंगचित्राच्या फ्रेम्स भेट दिल्या. मालिकेचे कथानक अंतिम वळणावर आले असून २० जुलैला “तुला पाहते रे” च्या इशा आणि विक्रांतच्या प्रेमकथेचा शेवट बघायला मिळणार आहे.
शेवटच्या भागात ईशा विक्रांतला क्षमा करेल का नाही हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेच्या शेवटच्या भागात विक्रांत सरंजामेंचा मृत्यु होणार असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये आहे.
“तुला पाहते रे” च्या शेवटच्या भागात हे घडेल ?
ईशाचे आईवडील ईशाच राजनंदिनी असल्याचे विक्रांतला सांगतात. विक्रांतला याचा फार मोठा धक्का बसतो. त्यानंतर आपण कुणाला तोंड दाखवायच्या लायक नाही असा विचार करुन विक्रांत सरंजामे आत्महत्यांचे पाऊल उचलतो. यामध्ये विक्रांत सरंजामेचा मृत्यु होऊन मालिकेचा दुःखद शेवट करतात की विक्रांत ईशाची माफी मागून ईशा त्याला माफ करून मालिकेचा शेवट गॉड करतात ते आज समजेलच ! पाहूया मालिकेचा शेवट उद्या संध्याकाळी ८:३० वाजता…
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.