यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने चांगला प्रयत्न केला होता, पण सेमी फायनलमध्येच भारताची गाडी पंक्चर झाली. आयसीसीच्या नियमांच्या आधारे इंग्लंडने बाजी मारत वर्ल्ड कप आपल्या नावावर केला.
त्यांना भलेमोठे बक्षिसही मिळाले. असो ! आपण आज १९८३ च्या वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाबद्दल बोलणार आहोत. कपिल देवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना त्यावेळी नेमका किती पगार मिळत होता यावर आपण प्रकाश टाकणार आहोत.
१९८३ चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना तेव्हा किती पगार मिळत होती ?
एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मकरंद वायंगणकर नावाच्या एका क्रिकेट पत्रकाराने आपल्या ट्विटर अकाउंटवर तो फोटो शेअर केला आहे. हा फोटो एका जुन्या वर्तमानपत्राचा आहे.
त्यात १९८३ मधील सर्व भारतीय क्रिकेट खेळाडूंची नावे, त्यांचा पगार आणि त्यांची सही आहे. आपल्याला वाचून आश्चर्य होईल की, १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट खेळाडूंना केवळ २१०० रुपये मासिक वेतन मिळत होते. अजून एक आश्चर्याची बाब म्हणजे कॅप्टन पासून तळातील खेळाडूंपर्यंत सर्वांना एकसारखेच वेतन होते.
भारतीयांनी काय प्रतिक्रिया दिल्या ?
मकरंद वायंगणकर यांनी हा फोटो शेअर करताना त्यावर “प्रत्येक खेळाडू १० कोटींसाठी पात्र आहे.” या फोटोवर सर्वसाधारण युजर्सने वेगवगेळ्या प्रतिक्रिया दिल्या. कुणी निषेध केला आहे तर कुणी म्हणत आहे त्या काळाच्या मानाने योग्य सॅलरी आहे.
तत्कालीन टीम इंडियाचे व्यवस्थापक असणाऱ्या बिशनसिंग बेदी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. त्यात ते म्हणतात, “खरंय, खेळाडूंना इतकं वेतन मिळत होते, पण व्यवस्थापकाला नाही.” कदाचित त्यांच्या म्हणण्याचा रोख असा होता की संघ व्यवस्थापकाला त्याहून कमी वेतन मिळत होते.
काय होतं यामागचे कारण ?
खरं पाहायला गेलं तर आज BCCI हे क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत मंडळ आहे. पण १९८३ मध्ये अशी परिस्थिती नव्हती. त्याकाळात BCCI कडे इतके बजेट नसायचे. भारतीय संघ १९८३ मध्ये जेव्हा वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा BCCI ने लता मंगेशकर यांचा एक कार्यक्रम आयोजित करून त्या माध्यमातून २० लाख रुपये गोळा केले. त्यातून सर्व खेळाडूंना प्रत्येकी १ लाख रुपये रक्कम देण्यात आली. भारतीय क्रिकेटने हे दिवस बघितले आहेत. आजची परिस्थिती कितीतरी वेगळी आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.