सैन्यातील जवानांचे आयुष्य हे संकटांनी भरलेले असते. देशसेवा करताना त्यांना अनेक गोष्टीचा त्याग करावा लागतो. आपल्या कुटुंबापासून पत्नीपासून दूर राहावं लागतं. एवढे असताना त्यांना जर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास सहन करावा लागत असेल तर आणखीनच संकटात वाढ होते. जवानांना वरिष्ठांकडून त्रास होणे नवीन नाही.
पण जवानांसोबत त्यांच्या पत्नीला देखील त्रास दिल्या जात असल्याचे गंभीर आरोप एका जवानानेच केले आहेत. एका जवानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याने गंभीर आरोप केले आहेत.
त्याने म्हंटले आहे, ‘जेव्हा आम्ही बॉर्डरवर ड्युटीसाठी तैनात असतो तेव्हा बळजबरीने आपल्या कुटुंबाला कुटुंब कल्याण केंद्रात ठेवावं लागतं. तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बायका आमच्या पत्नींना नोकर असल्यासारखी वागणूक देतात. अधिकाऱ्यांकडून आमच्या कुटुंबाचं शोषण केलं जातं. त्यांचा अपमान केला जातो. तसेच त्या आमच्या पत्नींना वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर नाचायला देखील लावतात आणि त्यांची थट्टा करतात.’
एवढेच नाही तर अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून नेहमीच त्यांना चुकीची वागणूक मिळते. कँटीन मधून काही सामान घ्यायचे असेल किंवा आरोग्य तपासणी करताना अपमान केला जातो. आर्मीच्या ड्रेसमध्ये असणाऱ्या आम्हा जवानांना घरातलं काम करावं लागतं. एका अधिकाऱ्याच्या घरी २०-२५ जवान हे फक्त घरचे काम करण्यासाठी असतात.
बघा व्हिडीओ-
जवानांना स्वैयंपाक बनवणे, कपडे धुणे, बूट पॉलिश करणे, भांडे घासणे आणि बाजारातून भाजीपाला खरेदी करण्यासारखे काम करावे लागतात. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या पत्नींना सॅल्यूट मारायला लावतात तसेच त्यांचे सर्व आदेश ऐकायला भाग पाडतात.
हा व्हिडीओ यावर्षी मे मध्ये सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यामध्ये जवानांचे आणि पत्नीचे शोषण केले जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.