सध्या सोशल मीडियाध्ये नवी टुम उठली आहे. FaceApp नावाच्या ऍपवरून तयार केलेले क्रिकेट खेळाडूंचे म्हातारपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ज्याला त्याला आपणही म्हातारपणी कसे दिसू हे पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
तरुण दिसण्यासाठी हजारो रुपये मेकअप, हेअरस्टाईल, जिमसारख्या गोष्टींवर खर्च करणाऱ्या तरुण आणि तरुणींनाही आपण म्हातारपणी कसे दिसेल हे जाणून घ्यायचंय. जो तो आपले असे फोटो शेअर करत आहे. का तर ट्रेंडिंग मध्ये आहे ना भाऊ ! ट्रेंडनुसार माणसं वागायला लागली आहेत.
सगळं खरं पण प्रायव्हसीचे काय ?
असे जे वेगवेगळे ऍप येतात त्यात आपली माहिती गोळा केली जाते. पण त्या डाटाच्या सुरक्षिततेचे काय हा विचार कोण करत नाही. आपली माहिती चोरी होऊ शकतो असा प्रश्न कुणाला पडत नाही. आजकाल मोबाईलमध्ये सगळ्यांची खतावणी/दप्तर असते. मग म्हातारं दिसण्याच्या नादात आपलं तारुण्य का खराब करून घ्यायचं ?
मे महिन्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार एका ऍपने करोडो लोकांच्या फोटोंचा वापर फेशिअल रिकग्निशन ऍप बनवण्यासाठी केल्याची बाब उघड झाली होती. नंतर ती सगळी माहिती थर्ड पार्टीला मोठ्या किमतीत विकली होती. FaceApp मुळे प्रायव्हसीचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
कंपनी पॉलिसी कशी असते ?
कोणतेही ऍप डाऊनलोड करण्यापूर्वी आपण पॉलिसी वाचतो का ? उदाहरणासाठी आपल्याला आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे. त्यासाठी कंपनीने आपल्याला काही अटी घातल्या आहेत. भलेमोठ्या कागदपत्रांचा बंचमधील सूचना वाचून सही करायला सांगण्यात येते. आपण वाचण्याचे कष्ट घेत नाही आणि सही करतो.
त्यात एक सूचना अशी असते की कंपनी तुमच्या गाडीची एक डुप्लिकेट चावीही बनवेल. अशा पद्धतीने तुमच्या गाडीला अजून एक मालक मिळाला. कंपनीच्या माणसाने तुमच्या पार्किंगमध्ये येऊन गाडी नेऊन फिरवून परत आणून दिली तरी तुम्ही काही बोलू शकत नाही, कारण तुम्ही अग्रीमेंटवर सह्या केल्या आहेत.
FaceApp पॉलिसी काय आहे ?
आपण आता फेसऍप पॉलिसी बघूया. ती एवढी काय मोठी नाही, पण आपण मेन चवीवर नजर टाकूया. त्यात म्हणले आहे, “You grant FaceApp a perpetual, irrevocable, nonexclusive, royalty-free, worldwide, fully-paid, transferable sub-licensable licence to use,…” अशी एक ओळ आहे. हाच तर खेळ आहे.
तुमच्याकडून सगळ्या परवानग्या घेतल्या आहेत. म्हणजेच तुमची चावी थोडीच देणार आहोत, डुप्लिकेट चावी देणार आहोत. तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे प्रायव्हेट चॅट आहेत, फोटो आहेत, तुमचे लोकेशन आणि इतर माहिती आहे. म्हणजे कंपनी तुमची गाडी जशी पार्किंग मधून नेऊ शकते, तशीच FaceApp कंपनी सुद्धा तुमची माहिती तुमच्या मोबाईल मधून नेऊ शकते.
FaceApp कंपनीचे रेकॉर्ड आहे खराब
FaceApp ही रशियाच्या सेंट पिट्सबर्ग येथील Wireless Lab कंपनीचे ऍप आहे. आणि हे ऍप आजकालचे नाही, तर दोन वर्षे जुने आहे. जेव्हा हे ऍप आले होते तेव्हा त्यात फोटोला HOT बनवण्याचाही एक पर्याय होता. हॉट बनवण्याच्या नावाखाली हे ऍप आपल्या चेहऱ्याचा रंग आणखी गोरा करत होते. यामुळे त्यावर रंगभेद पसरवत असल्याचा आरोपही झाला होता. त्याबद्दल कंपनीने माफीही मागितली होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.