विश्वचषकात दमदार कामगिरी केलेल्या भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाचे आव्हान न्यूझीलंडने पराभव करून संपुष्ठात आणले. विश्वचषकानंतर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या. विश्वचषकापूर्वीच धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चाना सुरुवात झाली होती.
पण विश्वचषक संपल्यानंतर पुन्हा या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत. भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. या दौऱ्यासाठी धोनीची निवड होणार का नाही हे बघण्यासारखे आहे. धोनीला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखले जाते.
आगामी मालिकेत त्याला निवड समिती संधी देते का विश्रांती देऊन निवृत्ती घेण्याचे संकेत देणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. धोनीने विश्वचषकात संथ गतीने खेळी केली होती. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
धोनीने भारताला २००७चा टी-२० वर्ल्डकप, २०११ चा वनडे वर्ल्डकप याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी देखील आपल्या नेतृत्वाखाली जिंकून दिली होती. याशिवाय अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला आहे.
धोनीच्या घरच्यांनाही वाटते निवृत्ती घ्यावी-
धोनीची येणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड होते का नाही हे बघण्यासारखे आहे. धोनीला संधी मिळाली तर या दौऱ्यात तो शेवटचा सामना खेळू शकतो. पण धोनीचे लहानपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांना वाटते कि धोनीने अजून एक वर्ष क्रिकेट खेळावे. आणि २०२० मधल्या टी-२० वर्ल्डकपनंतर निवृत्तीची घोषणा करावी.
केशव बॅनर्जी यांनी धोनीच्या निवृत्तीविषयी घरच्यांचे मत जाणून घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार धोनीच्या कुटुंबियांना वाटते कि धोनीने आता निवृत्ती घ्यावी आणि कुटुंबियांसोबत राहावे. त्याने रांचीमध्ये राहायला यावे. केशव बॅनर्जी यांनी रविवारी धोनीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी कुटुंबीयांनी सांगितले धोनीने क्रिकेट आता बंद करावं पण केशव यांनी त्यानं एक वर्ष खेळावं असं सांगितले.
धोनीच्या कुटुंबीयांनी सांगितले कि एवढ्या मोठ्या घराची काळजी कोण घेणार. त्यावर केशव बॅनर्जी यांनी त्यांना सांगितले “इतकी वर्ष तुम्ही हे घर पाहिलेत मग आणखी एक वर्ष सांभाळ करा”.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.