सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोवर सध्या बरीच टीका होत आहे, ज्यामध्ये एक कॅनेडियन दाम्पत्य एकमेकांचे चुंबन घेत आहे आणि त्यांच्या समोर एक सिंह मरून पडला आहे. दक्षिण आफ्रिकेत सफारी करताना या दोघा नवरा बायकोनेच त्या सिंहाची शिकार केली होती.
Darren आणि Carolyn Carter या दाम्पत्याने दक्षिण आफ्रिकेतील Legelela Safari मध्ये भाग घेतला होता. या सफारी दरम्यान त्या दोघांनी कमीत कमी दोन सिंह मारले आणि त्यांच्या सहल व्यवस्थापकाने त्या शिकारीचे फोटो आपल्या फेसबुक पेजवर टाकले. The Mirror च्या बातमीनुसार कॅनडाच्या Alberta मध्ये राहणारे हे दाम्पत्य Taxiderma चा व्यापार करतात. एका बाजूला ते स्वतःला संरक्षणवादी समजतात तर दुसऱ्या बाजूला शिकारीत हिस्सा घेतात.
सफारीच्या सहल व्यवस्थापकाने आपल्या फेसबुक पेजवर टाकलेल्या फोटोला कॅप्शन देताना त्यात लिहले आहे, “कलहरीच्या गर्मीत प्रचंड मेहनत…खूप छान…एक भयानक सिंह.” दुसऱ्या एका पोस्ट मध्ये लिहले आहे, “कलहरीच्या वाळवंटात जंगलातील सिंहाची शिकार करण्यासारखं दुसरं काही नाही.
शिकाऱ्यांच्या टीमला शाब्बासकी.” The Mirror ने त्या कॅनेडियन दाम्पत्याला संपर्क केला तेव्हा कार्टर यांनी सांगितले की, या बाबतीत काहीही प्रतिक्रिया देण्यास आम्हाला रस नाही. हे खूप राजकीय आहे.”
Legelela मध्ये जिराफासाठी २४०० युरो, झेब्र्यासाठी २००० युरो आणि चित्त, गेंडा, सिंह, हत्ती या प्रत्येकाच्या शिकारीसाठी वेगवेगळी किंमत चुकवून त्यांची शिकार केली जाऊ शकते. ट्रॉफी हंटिंगच्या विरोधात अभियान चालवणारे Eduardo Goncalves यांचे मानणे आहे की, त्या सिंहांना शिकार होण्यासाठीच तयार करण्यात आले होते.
ते म्हणतात निष्पाप जनावरांना मारण्यात काहीच मज्जा येत नाही. असे वाटते की त्या सिंहांना चार भिंतीच्या आत मारून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तयार केले जाते. या जोडप्याने सिंहाची शिकार करण्यासाठी २-३ लाख रुपये खर्च केले आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.