केसं गळणे ही आजकालची सर्वसाधारण समस्या बनली आहे. पण बहुतांश लोक या गोष्टीकडे तोपर्यंत लक्ष देत नाहीत, जोपर्यंत ही समस्या त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात प्रभाव टाकत नाही. भले ही समस्या कितीही साधी वाटत असेल, पण केस गळतीमुळे टक्कल पडून कुणाचाही आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पुढे दिलेले ७ रामबाण उपाय करून पाहिल्यास या केस गळतीच्या समस्येपासून तुमची कायमची सुटका होऊ शकते. पाहूया ते रामबाण उपाय :
१) भरपूर पाणी प्या : माणसाच्या केसांचे बीजकोष २५ % पाण्याने बनलेले असतात. त्यामुळे आपल्याला जितके शक्य होईल तितके पाणी प्यायले पाहिजे. म्हणजेच दररोज ८-१० ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे तुमचे केस मजबूत होतील आणि तुम्हीही निरोगी राहाल.
२) दारू आणि सिगारेट सोडा : एका संशोधनानुसार दारू आणि धूम्रपान यांचा परिणाम थेट आपल्या केसांवर होतो. जास्त नशा केल्यामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण क्रियेत अडथळे येतात. म्हणजेच तुमच्या केसांपर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोहचत नाही.
३) ताण घेऊ नका : जास्त ताण किंवा टेन्शन घेतल्यास केस गळती सुरु होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अधिक तणाव घेतल्यामुळे लोकांना Telogen Effluvium नावाचा आजार होतो. या आजारामुळे माणसाचे केस लवकर गळतात. त्यामुळे तणावाला दूर ठेवा.
४) नियमित व्यायाम करा : नियमित व्यायाम करण्यामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. म्हणजेच आपल्या कवटीच्या आतमध्येही रक्त गरजेनुसार पोहोचत असते. यामुळे केस गाळण्याची समस्या कमी होते.
५) आपला आहार सुधारावा : आपल्या जेवणात लोह, झिंक, सिलिका आणि व्हिटॅमिन्स यांची कमी असल्यास केस गळती होते. केसांच्या आरोग्यासाठी आपल्या आहारात पालक, स्ट्राबेरी, डाळ, अक्रोड इत्यादींचा समावेश करावा.
६) डोक्याची मालिश करावी : डोक्याची मालिश केल्यास केस मुळापासून भक्कम होतात. त्यामुळे केस तुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. यामुळे आठवड्यात कमीत कमी एकदा तरी चांगल्या रीतीने तेलाने मालिश करावी.
७) कांद्याचा रस : कांद्यामध्ये AnitiBacterial आणि AnitiFungal तत्वांचा समावेश असतो. कांद्याचा रस काढून केसांना लावल्यास केस गाळण्याची समस्या दूर होते. या सगळ्या उपायांचा अवलंब केल्यास नक्की फायदा होईल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.