वर्ल्ड कप २०१९ फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करून पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. मग या विजयाचे सेलिब्रेशन सुद्धा तितक्याच दणक्यात होणार हे उघड आहे. पण इंग्लंडच्या संघाचे सेलिब्रेशन सुरु असताना घडलेल्या एका प्रकाराचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
प्रेझेंटेशन सेरेमनी दरम्यान वर्ल्ड कप इंग्लंड संघाच्या हातात दिल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी जल्लोष करायला सुरुवात केली. कप उंचावत ते आनंद साजरा करायला लागले. शॅम्पेनच्या बॉटल उघडून त्यांचा जल्लोष सुरु असतानाच अचानक इंग्लंड संघातील मोईन आणि आदिल या दोन खेळाडूंनी त्या जल्लोषातून पळ काढला.
व्हिडीओ पहा :
I love Muslims pic.twitter.com/dTN9qT2to2
— Areeb Ullah (@are_eb) July 14, 2019
नक्की काय झालं होतं ?
मॅच प्रेझेंटेशनमध्ये इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गनच्या हातात वर्ल्ड कप देण्यात आला. सगळी टीम जोशात होती. चॅम्पियन्स लिहिलेल्या बोर्डासोबत फोटो सेशन सुरु होते. काही खेळाडू गुडघ्यावर बसले होते तर काहीजण उभे राहिले होते.
मोईन अली आणि रशीद आदिल एका बाजूला उभे राहून संघाच्या आनंदात सहभागी झाले होते. पण त्यांची नजर शॅम्पेनच्या बॉटलवर होती. जसे शॅम्पेनची बॉटल उघडली, तसे दोघांनी तिथून पळ काढला. ते बघून आजूबाजूला असलेले खेळाडू आणि सपोर्ट करणारे लोकही हैराण झाले.
मोईन आली आणि रशीद आदिल यांनी सेलेब्रेशन मधून पळ का काढला ?
इंग्लंडच्या संघातील मोईन अली आणि रशीद आदिल हे धर्माने मुस्लिम आहेत. इस्लाम धर्मात दारूला हराम मानले आहे. कदाचित हेच कारण असेल ज्यामुळे शॅम्पेनच्या बॉटलचे झाकण उघडताच त्या दोघांनी तिथून पळ काढला. तथापि शॅम्पेनची बॉटल उघडून आनंद साजरा करण्याचा रिवाज आहे. असे करणारे हे पहिले खेळाडू नाहीत. काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलानेही आपल्या बॅट आणि ड्रेसवर दारूच्या कंपनीची जाहिरात करायला नकार दिला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.