मोदी सरकार २ मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले होते. केंद्रात मंत्री बनल्यानंतर खासदार रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाची निवड होणार याच्या खूप चर्चा सुरु होत्या. आज या चर्चांना पुनर्विराम मिळाला असून आता भाजपने महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली आहे.
महाराष्ट्र सरकारमधले नंबर २ चे मंत्री असलेल्या चंद्रकांत दादा पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभेची निवडणूक भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात लढवणार हे निश्चित झाले आहे.
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तेव्हापासूनच ते प्रदेशाध्यक्षपद सोडतील, अशी चर्चा सुरू झाली होती.
सोबतच मुंबई अध्यक्षपदी आमदार मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती झाली आहे. भाजपने यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. आशिष शेलार यांची राज्यातील फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदी नियुक्ती झाल्यावर, मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सोपवली आहे.
Chandrakant Patil appointed as the President of Bharatiya Janata Party (BJP), Maharashtra. pic.twitter.com/Qoa8R3VBqX
— ANI (@ANI) July 16, 2019
१५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक होईल आणि १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल असा अंदाज आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांना केंद्रात तर मुंबई अध्यक्षांना राज्यात मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमानुसार पक्ष नव्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदाचा शोध वेगाने सुरु होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.