कित्येक लोक इतके टिपटॉपमध्ये राहतात की, त्यांच्या समोर येताच आपले मन प्रसन्न होऊन जाते. पण जसे ते लोक त्यांच्या पायातील बूट काढतात, तसे काही विचारूच नका. म्हणजे वरपासून खालपर्यंत हिरो प्रमाणे दिसणारे लोक पायातील त्यांच्या बूट काढताच त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे उपस्थित सगळ्या लोकांचे मन नाराज करतात. आता ही समस्या जर एका दिवसाची असती तर ठीक होते, पण कित्येकांच्या बाबतीत ही रोजचीच कहाणी आहे.
घरातले लोक एकवेळ बुटांमधून येणारा दुर्गंध सहन करतील, पण मित्र आणि नातेवाईक किंवा इतरांनी का म्हणून सहन करावं ? न राहवून त्यातलं कुणीतरी तुम्हाला बोललं तर काय करणार ? ही म्हणजे चारचौघात मान खाली घालावी लागेल अशी गोष्ट आहे. जर तुम्हाला अशाच फीलिंग येत असतील तर आता काळजी करू नका. आम्ही तुम्हाला असे १० उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्यावर अशी वेळ येणार नाही. पाहूया १० मॅजिक टिप्स…
१) रोज एकच बूट न घालता तुमच्याकडे कमीत कमी बुटांच्या दोन जोड्या असायला हव्यात. त्यामुळे बुटांच्या आतमध्ये पायाच्या घामामुळे येणारा ओलावा जाऊन ते कोरडे पाडण्यासाठी वेळ मिळेल.
२) बुटांच्या आतमध्ये मेडिकेटेड इन सोल लावावे. ते पायांचा येणारा घाम लवकरात लवकर शोषण्याचे काम करते. ३) बूट जर ओले झाले असतील तर उन्हात किंवा वेळ नसल्यास हेअर ड्रायरने कोरडे करून घ्यावेत आणि मगच घालावेत.
४) बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी दररोज स्वच्छ पायमोजे घालावेत. ५) बुटांचा दुर्गंध जाण्यासाठी त्यांना काही वेळासाठी बाहेर उन्हात वाऱ्यावर ठेवावे.
६) जर बूट धुवायला तुमच्याकडे वेळ नसेल तर रात्रभरासाठी बुटांमध्ये बेकिंग पावडर टाकावी आणि सकाळी उठल्यानंतर कोरड्या कापडाने साफ करावी. ७) काही लोकांच्या पायांनाही खूप दुर्गंधी येते, त्यामुळेच बूट किंवा चप्पल काढताच दुर्गंधी चहूबाजूला पसरते. पायांच्या दुर्गंधी पासून सुटका होण्यासाठी तळव्यांना लिंबू रगडुन पाण्याने धुवून घ्यावेत.
८) कोमट पाण्यात चहापावडर टाकून कमीत कमी अर्धा तास त्यात पाय बुडवून बसावे. दुर्गंधी पासून सुटका होईल. ९) बुटांच्या आतमध्ये शुभ्र व्हिनेगार शिंपडावे आणि कापडाने साफ करावे, दुर्गंधी निघून जाईल.
१०) या व्यतिरिक्त बुटांची दुर्गंधी घालवण्यासाठी फॅब्रिक सॉफ्टनर किंवा कंडिशनर शीत सुद्धा वापरता येईल. हे १० उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या बुटांच्या आणि पायांच्या दुर्गंधीपासून सुटका होईल. एकदा अवश्य करून बघा.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.