२०१९ च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारत वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडला. फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत ४४ वर्षांच्या वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला.
विजेत्या इंग्लंडच्या संघाला २७ कोटी ४१ लाख ५८ हजार रुपये तर उपविजेत्या न्यूझीलंड संघाला १३ कोटी ७० लाख ७९ हजार रुपये इतकी बक्षिसाची रक्कम मिळाली आहे. आपला भारतीय संघ सेमीफायनलमध्येच बाहेर पडल्याने त्याला मोकळ्या हाताने परत यावे लागले काय ? तर नाही ! भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये किती कमाई केली ते पाहूया.
भारतीय संघाला किती पैसे मिळाले ?
भारतीय संघाने ग्रुप स्टेजचे ९ सामने खेळले. त्यापैकी ७ सामने भारताने जिंकले. इंग्लंड विरुद्धचा एक सामना भारत हरला आणि न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. आयसीसीने निर्धारित केलेल्या नियमांच्या अनुसार या वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजवरील सामना जिंकणाऱ्या संघाला २८ लाख रुपये देण्यात आले.
म्हणजेच भारताने जिंकलेल्या ७ सामन्यांमधून १ कोटी ९६ लाख रुपये कमाई केली. जो सामना पावसामुळे होऊ शकला नाही त्या सामन्यात दोनी संघाला १४-१४ लाख रुपये वाटण्यात आले. म्हणजेच भारतीय संघाने ग्रुप स्टेज पर्यंतच्या सामन्यात एकूण २ कोटी १० लाख रुपये कमाई केली.
सेमी फायनलमध्ये भारताने किती रुपये कमावले ?
भारतीय संघ सेमी फायनलमध्ये जरी हरला असला तरी त्याला आयसीसीच्या नियमानुसार सेमी फायनल खेळल्याबद्दल बक्षिसाची रक्कम देण्यात आली. सेमी फायनल सामना खेळल्याबद्दल भारतीय संघाला ५ कोटी रुपये बक्षीस मिळाले.
म्हणजेच भारतीय संघाने ग्रुप स्टेजवर जिंकलेले ७ सामने, १ अनिर्णित सामना आणि सेमी फायनलचा सामना यातून एकूण ७ कोटी ६० लाख रुपये बक्षिस मिळाले. म्हणजेच भारतीय संघ मायदेशी मोकळ्या हातांनी नव्हे, तर चांगलेच ७ कोटी ६० लाख रुपये कमवून आला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.