अनेकदा अशी ठिकाणं आपण बघतो जिथे पुरुषांना प्रवेश असतो पण महिलांना मात्र प्रवेश नसतो. सहसा असे मंदिरात बघण्यात येते. अशी मंदिरे असतात जिथे हे घडते. पण पुरुषांना एंट्री नसणार आणि फक्त महिलांना एंट्री असणारं एखाद ठिकाण कधी बघितलं आहे का? एक असं आयलंड आहे जिथे पुरुषांना नो एंट्री आहे आणि तिथे फक्त महिलांना एंट्री आहे.
फिनलॅंडमध्ये हे आयलंड असून इथे पुरूषांना जाण्यास बंदी आहे. फिनलॅंडच्या बाल्टिक सी फेसजवळ असलेल्या या आयलंडचे नाव आहे सुपरशी. या अनोख्या आयलंडवर ८.४७ एकरात नयनरम्य रिसॉर्ट तयार करण्यात आलेलं आहे. अमेरिकेतील उद्योगपती महिला क्रिस्टीना रॉथने हे आयलंड खरेदी केलं आहे.
क्रिस्टीना रॉथला महिलांना सुट्टीचा आनंद घेता यावा अशा जागेचा शोध होता. या जागेवर फक्त महिलाच सुट्टी एन्जॉय करू शकतील अशी तिची संकल्पना होती. महिलांना सुट्टीचा आनंद घेताना कुठलीही अडचण आणि अडथळा येऊ नये हा त्यांचा हेतू होता. त्यानंतर त्यांनी सुपरशी येथे हे रिसॉर्ट तयार करण्याचे ठरवले.
सुपरशी आयलंडमध्ये हे रिसॉर्ट तयार करण्याचं काम सुरू आहे. या रिसॉर्टमध्ये ४ कॅबिन असतील आणि या कॅबिन्समध्ये आरामात १० महिला राहू शकतील. रिसॉर्टमध्ये स्पा, सोना बाथसहीत वेगवेगळ्या सुविधा असतील. सगळेच कॅबिन पूर्णपणे फिटनेसच्या आधारावर तयार केले जात आहेत.
यातील एक कॅबिनची किंमत २ लाख रूपयांपासून ते ४ लाख रूपयांपर्यंत राहील. यात महिला पाच दिवस आरामात घालवू शकतील. या आयलंडवर जाण्यासाठी तिकीट बुकिंग करण्याआधी महिलांना परवानगी घ्यावी लागेल. इतकेच नाही तर परवानगीसाठी त्यांना स्काइपच्या माध्यमातून चक्क मुलाखतही द्यावी लागेल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.