आज इंग्लड आणि न्यूझीलंड संघादरम्यान वर्ल्डकपची फायनल होणार आहे. आज दुपारी ३ वाजता फायनलला सुरुवात होणार आहे. दोनीही टीम अजून वर्ल्डकप जिंकलेल्या नाहीयेत. त्यामुळे यंदा नवीन विश्वविजेता बघायला मिळणार आहे. वर्ल्डकपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघानी जबरदस्त कामगिरी केली होती.
भारतीय संघ फायनलला जाईल अशी सर्व चाहत्यांना खात्री होती. पण न्यूझीलंड संघाने अनपेक्षितपणे भारताचा पराभव केला आणि भारत वर्ल्डकपच्या बाहेर गेला. पण भारतीय संघाला फायनलमध्ये बघण्यासाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांनी अगोदरच तयारी करून ठेवली होती. फायनलचे भारतीय चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात तिकीट घेऊन ठेवले होते.
आता भारतच फायनलमध्ये नसल्याने तिकीट घेतलेले चाहते निराश आहेत. त्यामुळे ते मॅच बघायला स्टेडियममध्ये जातील का नाही यावर शंका आहे. अन विशेष म्हणजे आता नवीन विश्वविजेता मिळणार असल्याने त्या देशांचे चाहते देखील स्टेडियममध्ये जाण्यास उत्सुक आहेत. पण त्यांच्याकडे तिकिटच उपलब्ध नाहीयेत.
पण भारताचे चाहते मॅच पाहण्यास उत्सुक नसल्याने त्यांनी हे तिकीट विकायला सुरुवात केली आहे. अन त्यातून त्यांना लखपती होण्याची संधी मिळाली आहे. तिकीट विकून भारतीय चाहत्यांनी लाखो रुपये कमावले आहेत.
वर्ल्ड कपच्या फायनलची एक तिकीट आयसीसीने २९५ पाऊंडला ठेवली होती, म्हणजेच २५४०८ रुपये एवढी त्याची किंमत होते. पण आता या तिकीटांचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्याच्या घडीला एका तिकीटाची किंमत १६ हजार पाउंड म्हणजे जवळपास १३.७९ लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे भारतीय चाहते अंतिम फेरीतील तिकीटं विकून लखपती होताना दिसत आहेत.
इंग्लंड आणि न्यूझीलंडचे चाहते मोठ्या प्रमाणात फायनल बघण्यास उत्सुक आहेत. कारण या दोन्ही संघांपैकी एक संघ प्रथमच वर्ल्डकप जिंकणार आहे. त्यामुळे साहजिकच चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे. त्यामुळे ते आता मोठी किंमत देऊन वर्ल्डकपच्या फायनलचे तिकीट खरेदी करत आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.