पुण्यात पुरुषांनी अंगावर सोनं घालणे हि काही नवीन गोष्ट नाही. अंगावर सोने घालणारे अनेक गोल्डमॅन महाराष्ट्रभर गाजले. त्यातील जास्तीत जास्त गोल्डमॅन हे पुण्यातीलच होते. पुण्यात गोल्डमॅन म्हणून सर्वात अगोदर ओळख कोणी मिळवली असेल तर ती स्व. आमदार रमेश वांजळे यांनी. रमेश वांजळे हे गोल्डमॅन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होते.
रमेश वांजळे यांच्यानंतरही पुण्यातील अनेक गोल्डमॅन प्रकाशझोतात राहिले. आता पुण्याला एक नवीन गोल्डमॅन मिळाला आहे. अंगावर एक दोन नाही तर तब्बल ५ किलो सोनं घालणारा हा गोल्डमॅन सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुण्यातील हा तरुण अंगावर तब्बल दीड कोटी रुपयाचं सोनं परिधान करत आहे.
कोण आहे हा पुण्यातील नवा गोल्डमॅन-
पुण्यातील या नव्या गोल्डमॅनचे नाव आहे प्रशांत सपकाळ. सोशल मीडियावरून प्रशांतचे फोटो प्रचंड व्हायरल झाले असून त्याला गोल्डमॅन अशी ओळख मिळाली आहे. प्रशांतने लहानपणीच बप्पी लहरी यांना बघून आपणही अंगावर असेच सोने घालायचे ठरवले होते.
विशेष म्हणजे प्रशांतचा जन्म एखाद्या धनाढ्य कुटुंबात देखील झालेला नाहीये. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला प्रशांत स्वतःचा व्यवसाय करतो. तसेच गोरगरिबांना मदत करून सामाजिक कार्य देखील तो करतो.
प्रशांत सोन्याच्या चैन, लॉकेट, ब्रेसलेटच्या स्वरपुट तब्बल ५ किलो सोने अंगावर घालतो. प्रशांतने स्वतःच स्वतःचे हे स्वप्न पूर्ण केले आहे. यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. यापूर्वी पुण्यातील सनी वाघचौरे यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
सनी वाघचौरे हा देखील पुण्यातील एक युवा उद्योगपती असून तो देखील अंगावर खूप सोने घालून वावरतो. सनीला देखील गोल्डमॅन म्हणून देशभरात ओळख मिळाली आहे. सनीकडे सोन्याच्या अनेक वस्तू देखील आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.