इतर खेळांप्रमाणे क्रिकेट खेळातही अंधश्रद्धा काय नवीन गोष्ट नाही. खेळाडू आहे का अंपायर का प्रेक्षक याने काय फरक पडत नाही. असे करण्याने आपली किंवा आपल्या संघाची कामगिरी चांगली राहील असे त्यांना वाटत असते. मॅच सुरु असताना बघणारे लोकही एकाच जागी बसून, जागा बदलून किंवा नखे चावून आपल्या संघासाठी प्रार्थना करताना दिसतात.
खेळाडू १३ आकडा अपशकुनी मानतात. अम्पायरही १११, २२२, ३३३ अशा धावसंख्या झाल्यावर एक पाय उचलताना आपण बघितले आहेत. आज आपण आपल्या भारतीय संघातील प्रसिद्ध खेळाडूंच्या अंधश्रद्धा बघणार आहोत.
१) रोहित शर्मा –
सामना सुरु होण्याआधी किंवा टीम मीटिंगला जाण्याआधी रोहित शर्मा आपल्या पत्नीला कॉल करतो. मैदानावर उतरताना आपले उजवे पाऊल पहिल्यांदा टाकले तर आपण चांगला खेळ करू शकतो असे त्याला वाटते. बॅटिंग करताना त्याच्यावर प्रेशर आला तर मैदानात चहूबाजूला नजर फिरवून एक जागा ठरवतो आणि मोकळ्या वेळात त्या जागेकडे पाहत बसतो.
२) विराट कोहली –
आपण घालत असलेले कडे आपाल्यासाठी लकी असल्याचे विराट मानतो. तसेच ज्या सामन्यात विराट चांगल्या धावा बनवतो, त्या सामन्यात घातलेले ग्लोव्ह्ज तो जपून ठेवतो. पुढच्या सामन्यात बॅटिंगला उतरताना तो यातलेच ग्लोव्ह्ज घालतो.
३) महेंद्रसिंग धोनी –
धोनी ७ या अंकाला आपला लकी नंबर मानतो. त्याचा जन्म ७ व्या महिन्यातील ७ तारखेला झाला होता. त्याच्या जर्सीचा नंबरही ७ असतो. धोनीने २००७ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. एकाच सामन्यात १० सिक्सर मारणारा तो जगातील ७ वा खेळाडू आहे. ७००० धावा बनवणाराही तो ७ वा खेळाडू आहे.
४) सौरव गांगुली –
भारतीय क्रिकेटमध्ये सौरव गांगुली जसा दादा खेळाडू होता तसेच तो अंधश्रद्धाही पाळत होता. मैदानावर उतरल्यानांतर दादा आपल्या खिशात गुरूचा फोटो ठेवून खेळायचा, त्यामुळे आपल्या गुरूचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचे त्याला वाटायचे. तसेच दादाच्या बोटांमध्ये अनेक खड्यांच्या अंगठ्या असायच्या. दादाच्या गळ्यातही अनेक माळा घातल्याचे आपण पहिले असेल.
५) सचिन तेंडुलकर –
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही बॅटिंगला उतरत असताना आपल्या डाव्या पायाचे पॅड आधी बांधायचा. २०११ च्या वर्ल्डकपमध्येही सचिन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचच्या अंतिम क्षणांमध्ये मॅच पाहण्याऐवजी आतल्या मसाज टेबलवर जाऊन झोपला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.