हॉलिवूडचा यावर्षी आलेला हॉरर चित्रपट ” Annabelle comes home” बघत असताना बर्नार्ड चैनींग नावाच्या एका ७७ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला असल्याची बातमी आपण वाचलीच असेल. बर्नार्ड ब्रिटन मध्ये राहायचे आणि सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी ते थायलंडला आले होते. तिथे ते एकटेच चित्रपट बघायला गेले होते.
चित्रपट संपल्यानंतर लाईट सुरु झाल्या तेव्हा त्यांच्या शेजारच्या सीटवर बसलेल्या एका महिलेने बघितले तेव्हा बर्नार्ड त्यांच्या सीटवर मृत पडल्याचे तिला दिसले. हा काय पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही अनेकदा हॉरर चित्रपट बघताना प्रेक्षकांचा मृत्यू झाल्याचे प्रकार घडले आहेत. चला त्यावर एक नजर टाकूया…
१) The Conguring 2 (2016) –
भारतातील तामिळनाडूच्या तिरुवण्णामलाई मध्ये हा चित्रपट बघत असताना एका ६५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा चित्रपट भूत पकडणाऱ्या ऍड वॉरेन आणि लॉरेन वॉरेन यांच्या डायरीवर आधारित होती. चित्रपटातील कथा १९७७ मध्ये इंग्लंडच्या लंडनमध्ये घडलेल्या अत्यंत भीतीदायक अशा भुताटकीच्या घटनेवर आधारित होती. त्यामध्ये पॅग्गी नावाच्या एका महिलेच्या मुलीवर भुताची सावली असते.
२) राजु गारी गदी (2015) –
हैद्राबादमध्ये राहणाऱ्या एका खाजगी शिक्षकाने हा चित्रपट बघत असताना आपला जीव गमावला होता. डॉक्टरच्या माहितीनुसार त्याचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने झाला होता. चित्रपटाची कथा अशी होती की, एक टीव्ही चॅनेल एका भुताटकी असलेल्या बंगल्यात होणाऱ्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी एका रियालिटी शोचे आयोजन करतो. त्यांनतर शोमध्ये भाग घेणाऱ्या लोकांबाबतही या घटना घडतात आणि एकेकाचा गूढ पद्धतीने मृत्यू होतो.
३) भूत (2003) –
रामगोपाल वर्मांनी बनवलेला हा चित्रपट बघत असताना दिल्लीमध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. कारण होते हृदयगती बंद पडणे. या चित्रपटाची कथा मनजीत नावाच्या मुलीच्या भुताची होती. उर्मिला मातोंडकर आणि अजय देवगण राहत असणाऱ्या घरावरून पडून मनजीतचा मृत्यू झालेला असतो. ते भूत उर्मिलाच्या शरीरात येत असते.
४) The Creeping Unknown (1956) –
शिकागो मधील एका थिएटरमध्ये हा चित्रपट बघत असताना एका ९ वर्षांच्या स्टुअर्ट नावाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्याच्या पालकांना सुद्धा चित्रपट संपल्यावर हे समजले. हृदयगती बंद पडल्याने मुलाचा मृत्यू झाला होता. चित्रपटाची कथा एका अंतराळवीरावर आधारित होती, जो अंतराळातून परत आल्यावर राक्षस बनतो.
५) The Ridewr Of Sculls (1965) –
टेक्सासच्या रॉयल थिएटरमध्ये हा चित्रपट बघत असताना एका व्यक्तीचा हृदय बंद पडल्याने मृत्यू झाला होता. चित्रपटाची कथा लोकांवर हल्ले करणाऱ्या मानवी लांडगा, व्हॅम्पायर आणि बिनडोक्याच्या हॉर्समनवर आधारित होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.