विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मोहम्मद शमीला वगळून भुवनेश्वर कुमारला संघात स्थान मिळालं तर कुलदीप यादवच्या जागी युजुवेंद्र चहलला संधी मिळाली.
न्यूझीलंडच्या फलंदाजाना भारतीय गोलंदाजाच्या घातक माऱ्याचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी न्यूझीलंडला परेशान करून सोडले. न्यूझीलंडला पहिला चौकार मारण्यासाठी 8 व्या ओव्हरपर्यंत वाट बघावी लागली.
न्यूझीलंडने 46.1 ओव्हरमध्ये 5 बाद 211 धावा केल्या आहेत. पण या सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या उपांत्य फेरीच्या लढतीत पाऊस पडला आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.
उपांत्य फेरीत जर पाऊस पडला आणि पूर्ण दिवस सामना होऊ शकला नाही किंवा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर आज सामना झाला नाही तर उद्या हा सामना पुन्हा खेळवण्यात येऊ शकतो. पण राखीव दिवशी सामना नव्याने सुरु होणार नाही, तर आता जी सामन्याची स्थिती आहे त्यानुसारच राखीव दिवशी सामना सुरु होणार.
न्यूझीलंडला पुन्हा फलंदाजी करण्याची संधी नाही मिळाली तर एवढे असेल भारतासमोर लक्ष्य-
जर पावसामुळे न्यूझीलंडला पुन्हा फलंदाजी करण्याची संधी नाही मिळाली तर भारतासमोर DRS नुसार 46 ओव्हरचा खेळ झाल्यास 237 धावांचे लक्ष्य असेल. तर 40 ओव्हरमध्ये 223 धावांचे, 35 ओव्हरमध्ये 209 धावांचे, 30 ओव्हरमध्ये 192 धावांचे, 25 ओव्हरमध्ये 172 धावांचे, 20 ओव्हरमध्ये 148 धावांचे लक्ष्य असेल.
पावसामुळे सामना रद्दच झाला तर काय होईल?
पावसामुळे आज खेळ नाही झाला तर आजच्या स्थितीपासून पुढे उद्या खेळ सुरु होईल. जर उद्या पण पावसामुळे खेळ न झाल्यास सामना रद्द होईल. सामना रद्दच झाला तर गुणतालिकेत जो संघ पुढे आहे त्या संघाला फायनलचे तिकीट मिळेल.
गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा सामना चौथ्या स्थानावर आहे.त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचेल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.